• Mon. May 5th, 2025

अखेर निर्णय झाला ; मुख्यमंत्री सिद्धरामय्या तर शिवकुमार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ ?

Byjantaadmin

May 17, 2023

कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर गेल्या चार दिवसापासून चर्चा सुरु होती, या चर्चेवर आता पडद्या पडला आहे.सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले. आज दुपारी एक वाजता राहुल गांधी याबाबत घोषणा करणार आहेत.चार दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या. मुख्यमंत्रीपदासाठी डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे शर्यतीत होते. याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.

Karnataka CM News

या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी निरीक्षकांना सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा करण्यास सांगितले होते. यात 80 हून अधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने मतदान केले.डी.के. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री यांच्यासह ऊर्जा आणि पाटबंधारे ही दोन खाते आणि प्रदेशाध्यक्ष ही दोन खाती असतील. उद्या (१८ मे) शपथविधी सोहळा होणार आहे.मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित करण्यासाठी kharge यांच्या निवासस्थानी काल (मंगळवारी) बैठक बोलवण्यात आली होती. डी.के.शिवकुमार यांनी दिल्ली येथे खर्गे यांची भेट घेतली.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपल्या योगदानाबाबतची माहिती डी.के.शिवकुमार यांनी खर्गे यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांनी दावा केला आहे. आज दुपारी याबाबत राहुल गांधी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत.कर्नाटकात काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. लवकरच मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होणार आहे. या वेळी विधानसभेत पोहचलेले बहुसंख्य आमदार हे कोट्याधीश आहेत. Myneta.info या संकेतस्थळांनुसार, यंदा निवडून आलेले २२४ आमदार यांची एकूण संपत्ती १० हजार ८३४ आहे. यात भाजप, काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांचा समावेश आहे.

कर्नाटकात सर्वात श्रीमंत आमदार एच.के. पुत्तास्वामी गौंडा हे ठरले आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आपल्या निवडणूक अर्जात त्यांची संपत्ती १,२६२ कोटी असल्याची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानावर आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार.त्यांची संपत्ती १,१४९ कोटी रुपये आहे.तिसऱ्या क्रमांकावर congress आमदार सुरेश बीएस हे आहेत त्यांच्याकडे ५०० कोटींची संपत्ती आहे. भाजपचे सर्वात श्रीमंत आमदार एचके सुरेश आहेत. त्यांच्याकडे ४२३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर जेडीएसचे आमदार एम.आर.मंजूनाथ यांच्याकडे २५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *