र्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
UP मधील अमरोहाच्या हसनपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी चक्क एका मृत उमेदवाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आता या प्रकाराची चांगलीच चर्चा होत आहेअमरोहाच्या हसनपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आशिया या 25 वर्षीय तरुणीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण निवडणुकीच्या मतदानापूर्वीच आशियाचा मृत्यू झाला. यानंतरही परिसरातील जनतेने आशियाला MATDAN केलं.
निकाल समोर आल्यानंतर चक्क आशिया या ELECTION निवडून आली. मतमोजणी झाल्यानंतर आशिया जिंकल्याची माहिती समोर आली. त्यावेळी अनेकांनी हळहळ व्यक्त केली.फुफ्फुस आणि पोटाच्या संसर्गामुळे आशियाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. तर आशिया मृत्यूनंतरही निवडून आल्यामुळे लोकांच्या हृदयात जिवंत राहिली आहे.