शिक्षक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरावर विकासरत्न विलासराव देशमुख ज्ञानरत्न शिक्षक, उपक्रमशील शाळा पुरस्काराचे गुरुवारी युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार वितरण
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना सहकार भूषण तर वाचन प्रेरक पुरस्कार सौ दीपशिखा धीरज देशमुख यांना देऊन होणार गौरव
लातूर :-महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने 20 ऑक्टोबर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता लातूर येथील दयानंद सभागृहात विकासरत्न विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार देऊन जिल्ह्यातील शिक्षकांचा तसेच सहकार भूषण पुरस्कार राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना तर वाचन प्रेरक पुरस्कार रीडच्या प्रणेत्या सौ दीपशिखा धीरज देशमुख यांना युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे यावेळी सत्कारमूर्ती माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रम काळे तर प्रमूख उपस्थिती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, शिक्षक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष कालिदासराव माने, छावा संघटनेचे युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे
सदरील कार्यक्रमात जिल्ह्यांतील शिक्षक, सर्व संघटना, पदाधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी ,बंधू भगिनी, नागरिकानी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे समस्थ पदाधिकारी यांनी केले आहे