स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
निलंगा/ प्रतिनिधी:- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निलंगा शहरात प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
निलंगा शहरातील दत्तनगर कॉर्नर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी “छत्रपती संभाजी महाराज की” “जय जिजाऊ जय शिवराय” अशा घोषणा देत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम. एम. जाधव, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक पी. एस. सगरे,कार्याध्यक्ष आर. के. नेलवाडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम,मराठा सेवा संघाचे सचिव इंजिनियर मोहन घोरपडे, डी. एन. बरमदे, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, अनिल जाधव, बाळू जाधव, किशोर जाधव, नितीन जाधव, भास्कर यादव, प्रताप सोमवंशी, आनंद जाधव,किरण धुमाळ,सावंत एम आर,चाम्बरगे व्ही.एम.,बिरादार आर टी, सचिन राजनाळे, योगेश तेलंग यांच्यासह अनेक शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.