• Mon. May 5th, 2025

प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तातून आलेल्या ई-मेलमधून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

Byjantaadmin

May 14, 2023

पुणे : संशोधन व विकास संस्थेचे (आर अँड डीई-ई) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तातून आलेल्या ई-मेलमधून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या ई-मेलचा तांत्रिक तपास सुरू असून, कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांना कोणती संवेदनशील माहिती पाठवली; तसेच सुरक्षाविषयक कोणती छायाचित्रे पाठवली, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या ई-मेलच्या उत्तरात पाकिस्तानकडून आलेल्या ई-मेलमध्ये काय म्हटले आहे, हे समोर आल्यास या रॅकेटचा उलगडा होऊ शकेल

.Pradeep Kurulkar Honeytrap

‘एटीएस’कडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा माहिती अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी कुरुलकर यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ‘एटीएस’कडून करण्यात आली होती. कुरुलकर यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप गंभीर असून, या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने कुरुलकर यांना १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. ही मुदत संपत असताना ‘एटीएस’कडून करण्यात आलेल्या तपासात आणखी काय माहिती हाती लागली आहे, याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे.

कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठविण्यात आले आहेत. कुरुलकर यांनी पाकिस्तानातील आयपी ॲड्रेसवर मेल पाठवल्याची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारे काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाइलमधून याबाबतचे धागेदोरे मिळाले आहेत. याबाबतचा अहवाल ‘एटीएस’तर्फे न्यायालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे.

देशाच्या सुरक्षिततेला बाधा आणणारी माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरविल्याच्या शक्यतेवरून कुरुलकर यांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात येईल, असे ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी विशेष पारपत्राचा वापर करून कुरुलकर यांनी मागील वर्षी सहा देशांना भेटी दिल्या. या दरम्यान, ते कोणाला भेटले, हे शोधण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. केवळ प्रदीप कुरूलकरच नव्हे तर भारतीय गुप्तचर खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर यांना ज्या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवले तिने गुप्तचर खात्यातील एका अधिकाऱ्याशीही संपर्क साधला होता. प्रदीप कुरुलकर यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र एटीएसने गुप्तचर खात्यामधील संबंधित अधिकऱ्याचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे. या मोबाईलमधील बरीच माहिती डिलीट करण्यात आली होती. त्यामुळे हा डेटा परत मिळवण्यासाठी अधिकाऱ्याचा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

रदीप कुरूलकर हनीट्रॅपमध्ये कसे अडकले?

एटीएसचे अधिकारी सध्या प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी करत आहेत. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्याकडून भारताविषयीची गोपनीय माहिती काढून घेतल्याचे वृत्त समोर आले होते. कुरूलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले असले तरी संबंधित महिलेने त्यांना ब्लॅकमेल केले नव्हते. या महिलेने कुरुलकर यांच्याशी प्रेमाने आणि गोडगोड बोलून माहिती काढून घेतली. ‘मला भारतीयांचा अभिमान आहे. तुम्ही चांगले शास्त्रज्ञ आहात. मी पण भारतीय आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्याच क्षेत्रात मलाही देशासाठी काहीतरी करायचं आहे’, असे ही महिला कुरुलकर यांना सांगत होती. याचदरम्यान बोलण्यात गुंतवून गोडीगुलाबीने महिलेने ब्राह्मोस, अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्रांविषयीची गोपनीय माहिती कुरूलकर यांच्याकडून काढून घेतल्याचा संशय आहे. एटीएसचा जो अधिकारी महिलेच्या संपर्कात आला होता, त्यानेदेखील कोणती गोपनीय कागदपत्रं पाकिस्तानला दिली आहेत का, याचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. दरम्यान, एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलेली माहिती पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिली आहे. ज्या मोबाईल नंबरचा वापर करुन प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आले, त्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

कुरूलकरांचा ई-मेलवरुन पाकिस्तानशी संपर्क

संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (आर अँड डीई- ई) संचालक डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यांच्याकडून संदेशांची देवाण-घेवाण झालेले संशयित मेल आयडी पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुगल कंपनीने यासंबंधीचा अहवाल दिला असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले. मात्र, मेलद्वारे नेमके काय संभाषण झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे फोटो शेअर केले असल्याचेही समोर आले आहे. न्यायालयाने या प्रकरणात कुरुलकर यांना १५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दिघी येथील अभियांत्रिकी संशोधन व विकास संस्थेचे (आर अँड डीई- ई) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना तीन मे रोजी ‘एटीएस’ने अटक केली. कुरुलकर यांच्याविरोधात ‘डीआरडीओ’च्या दक्षता आणि सुरक्षा विभागाचे संचालक कर्नल प्रदीप राणा यांनी तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *