कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय भाजपला पराभवाची धूळ चारली. काँग्रेस पक्षानं दक्षिण भारतातलं कर्नाटक सारख्या राज्यात बहुमताचा आकडा गाठत विजय मिळवला. हा विजय काँग्रेस पक्षासाठी नक्कीच संजीवनी देणारा ठरला आहे. काँग्रेसच्या विजयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यात आघाडीच्या नेतेमंडळींकडून २०२४ ला देशासह महाराष्ट्रातही परिवर्तन होणार असल्याचा दावा करतानाच भाजपवर निशाणा साधला जात आहे. याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे
मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे बदलापूर अंबरनाथ उल्हासनगरच्या दौऱ्यावरती आहेत. आज बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर येथे मनसे पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान या चारही शहरांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केली असून डोंबिवली आणि अंबरनाथमधील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बॅनरची चर्चा आता रंगू लागली आहे.मनसेच्या बॅनर वरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हिंदूधर्माभिमानी असा उल्लेख केला आहे.त्यामुळे या बॅनरची चर्चा आता सर्व ठिकाणी होऊ लागली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काल रात्री अंबरनाथ मध्ये वास्तव्याला होते, तर आज रात्री वास्तव्यला असतील.
राज ठाकरे हे अंबरनाथ येथे कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशीं संवाद साधला. ठाकरे म्हणाले,विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो.तर सत्ताधारी पक्ष हा हरत असतो. आणि हा पराभव स्वभावाचा, वागणुकीचा पराभव आहे.आणि आपलं कोण वाकडं करु शकतं हा जो विचार आहे त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरु नये हा बोध सर्वांनी कर्नाटक निकालावरुन घ्यायला हवा असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.यावेळी त्यांनी कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातही सत्तापरिवर्तन होणार का यावर भाष्य करताना हे सांगायला मी काय ज्योतिषी नाही अशी टिप्पणीही केली.कर्नाटकच्या निकालात राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला दिसतो असं विधान राज ठाकरेंनी यावेळी केलं. तसंच माध्यमांनी किंवा त्यांच्या मालकांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम लोकांमध्ये झालेला दिसतो असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
…म्हणून ठाकरेंच्या बॅनरची जोरदार चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बदलापूर अंबरनाथ उल्हासनगरच्या दौऱ्यावरती आहेत. आज बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर येथे मनसे पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान या चारही शहरांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केली असून डोंबिवली आणि अंबरनाथमधील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बॅनरची चर्चा आता रंगू लागली आहे. मनसेच्या बॅनरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘हिंदूधर्माभिमानी’ असा उल्लेख केला आहे.त्यामुळे या बॅनरची चर्चा आता सर्व ठिकाणी होऊ लागली आहे.