• Mon. May 5th, 2025

कर्नाटकाच्या जनतेला दिलेली विकासाची गॅरंटी काॅंग्रेस पुर्ण करेल

Byjantaadmin

May 14, 2023

जनमानसाच्या मनात असलेली काँग्रेस (Congress) पक्षाची वॉरन्टी आणखी वाढली आहे, हे मतदारांनी आजच्या कर्नाटक विधानसभा निकालातून दाखवून दिले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कायमच लोकांचे प्रश्न मांडले. महागाई, रोजगार अशा सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना काँग्रेसने ‘आवाज’ दिला.

या आवाजाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे हा निकाल आहे, अशा शब्दात लातूर ग्रामीणचे काॅंग्रेस MLA DHIRAJ DESHMUKH यांनी आनंद व्यक्त केला. २०२४ मध्ये देशाला नवी दिशा देणारा हा निकाल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विरोधी पक्षांना जनतेने सत्तेपासून दूर ठेवले आहे.काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, RAHUL GANDHI प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर विश्वास दाखवित कर्नाटकची एकहाती सत्ता तेथील जनतेने आता सुरक्षित हातात दिली आहे.

याबद्दल कर्नाटक जनतेचे मनापासून आभार. काँग्रेसचा भर हा कायमच विकासावर असतो. त्यामुळे विकासाची दिलेली गॅरन्टी काँग्रेस पक्ष नक्कीच पूर्ण करेल आणि मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल, याचा विश्वास असल्याचे धिरज यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *