बंगळुरू : दक्षिण भारतातील राजकीय अस्तित्वासाठीचा भाजपचा लढा; तर, राष्ट्रीय राजकारणातील अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा लढा अशा संघर्षातून जणू निवडणूकयुद्धच लढल्या गेलेल्या कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने दहा वर्षांनंतर कर्नाटकात १३६ जागांवर विजय वा आघाडी मिळवत एकहाती विजय प्राप्त केला आहे. एकूण २२४ जागांच्या विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा ११३चा आकडा सहज पार केला असून, भाजपला ६५, तर सेक्युलर जनता दलास (जेडीएस) १९ जागांवर रोखले आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी सरसावलेल्या काँग्रेसच्या कर्नाटकातील या विजयाबद्दल विरोधी पक्षांचे प्रमुख नेते नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले असून, लोकसभा निवडणुकीसह आगामी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगण विधानसभा निवडणुकीतही भाजपविरोधात हाच कौल दिसेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कर्नाटक मध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा जवळपास 20 दिवस होती ज्या जिल्ह्यातुन यात्रा मार्गक्रमण केली तिथं या निवडणुकीत परिणाम जाणवलं आहे.