• Mon. May 5th, 2025

निलंग्यात विविध मागण्यांसाठी पत्रकारांचे आंदोलन 

Byjantaadmin

May 13, 2023
निलंग्यात विविध मागण्यांसाठी पत्रकारांचे आंदोलन
निलंगा /प्रतिनिधी
           माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निलंग्यात व्हाॅईस आॅफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करुन मागणीचे निवेदन देण्यात आले.
         निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात अदी मागण्यांचा समावेश आहे.
            आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष तुकाराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजाभाऊ सोनी, उपाध्यक्ष असलम झारेकर, सरचिटणीस मलिकार्जून कोळ्ळे, संघटक प्रमोद कदम, सदस्य रमेश लांबोटे, विवेक वाडीकर अदी पत्र उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *