लातूर (जिमाका) :- विविध केंद्रीय कृषि योजनाची माहित विषद करून योजनांचा व अद्यावत कृषी तंत्रज्ञानाचा जिल्हातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी आवाहन केले.
पी.एम. किसान सम्मान सम्मेलन योजने अंतर्गत १२ व्या. हप्ता वितरण शुभारभ कार्यक्रम नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली यथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपनाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र लातूर येथे आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्र व कृषी विभाग लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. दिग्रसे एस. एस. यांनी आपल्या प्रस्ताविक मार्गदर्शनामध्ये केंद्राद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन केंद्र शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीकरिता सतत कार्य करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. अरुण गुट्टे, कृषी विद्यावेता वनामकृवि परभणी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राजमा उत्पादन तंत्रज्ञान व रब्बी हंगामातील पर्यायी पिके यावरती सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास श्री अरविंद भोसले सदस्य दिशा ,श्री सोनकांबळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंजाळ ए ए व आभार बेद्रे एस बी यांनी मानले कार्यक्रमास जिल्यातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्तीत होते.