‘आम्हाला सोईचे असलेले गैरसोईत का घालता ?
गैरसोयीचे नको सोईचे करा’
मदनसुरी महसूल मंडळ निलंग्यालाच हवे
मंडळातील अनेक गावाची निवेदनाद्वारे मागणी
निलंगा, (तालुका प्रतिनिधी):- कासारसिरसी येथे निलंगा येथील तहसीलचे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले असून याबाबतचा शासन आदेश जारी झाला असला तरी या निर्णयाला मदनसुरी मंडळातील काही ग्रामपंचायतीने तिव्र विरोध दर्शवला आहे. आमचे कामकाज कासारसिरसीला नव्हे तर निलंग्यालाच हवे अशी मागणी या भागातील ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे तहसिलदाराकडे केली आहे.
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघाला असलेली 68 गावचे केंद्र म्हणून कासारसिरशी येथे विजवितरण उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग याचे उपविभागीय कार्यालयाला मंजूरी मिळवली आहे. त्यातच एक आणखी एक भर म्हणून कासारसिरसी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी यापूर्वीच हलचाली सुरू होत्या दोन दिवसापूर्वीच याबाबतचा शासन निर्णय निघाला असून औसा विधानसभा मतदार संघाला निलंगा तालुक्यातील जोडलेली ६८ गावासाठी कासारसिरसी येथे अप्पर तहसील मंजूर करण्यात आले आहे मात्र मदनसुरी महसूल मंडळा अंतर्गत येणारे मदनसुरी, रामतीर्थ, धानोरा, बामणी, जेवरी, लिंबाळा, येलमवाडी, जेवरी, सरवडी, एकोजी- मुदगड, नदीहत्तरगा, कोकळगाव, हाडोळी गावाला बाजार पेठ, शाळा, कॉलेज, दवाखाना या दृष्टीकोनातून निलंगा हे महत्वाचे शहर असून कासारसिरशी येथे जरी अप्पर तहसील झाले तरी आमचा शासकीय व्यवहार निलंगा येथील तहसील कार्यालयाकडे ठेवावा ही गावे निलंगा येथेच जोडावी अशी मागणी येथील नागरिककांनी निवेदनाद्वारे केली आहे. दळणवळणासाठी कासारसिरशी पेक्षा निलंगा अंतर जवळ असून कोणत्याही परिस्थितीत मदनसुरी मंडळातील गावे कासार सिरशीला जोडू नये अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. या मंडळातील काही गावाचे ग्रामपंचायतचे ठरावही तहसीलदार अनुप पाटील यांना प्रमुखांनी निवेदनाद्वारे दिले आहेत.. कोणत्याही परिस्थितीत कासारसिरशी अप्पर तहसील कार्यालयाला आमची गावे जोडू नये अशी मागणी केली आहे.
प्रा. अशोक सूर्यवंशी : सरपंच मदनसुरी
…….
निलंगा कसा सोयीस्कर आहे याबाबत कारण भौगोलिक दृष्ट्या अंतर कमी व्यापारी दृष्टिकोनातून सर्व व्यवहार सुलभ, दळणवळणाची सर्वाधिक सुविधा, शेतकरी मजूर कामगार शैक्षणिक दृष्ट्या व्यापारी मोठी बाजारपेठ असून
राजकीय राजकीय कार्यकर्ते व इतर सोयीचे ठिकाण निलंगा आहे.