निलंगा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघावर मुख्य प्रशासकपदी सत्यवान धुमाळ यांची नियुक्ती पदभार स्विकारला
निलंगा(शहर प्रतिनिधी) : निलंगा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती राज्यशासनाकडून करण्यात आली असून त्यामध्ये मुख्यप्रशासकपदी सत्यवान धुमाळ यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी ता. नऊ रोजी पदभार स्विकारला आहे. या संघावर प्रशासकीय नऊ संचालक मंडळाचा समावेश करण्यात आला असून जवळपास ६३ वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या खरेदी विक्री संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आल्याने हा संघ भाजपाच्या ताब्यात गेला आहे.
काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या सहकार संघाचे नेतृत्व केले आहे. राजकारणाची सुरवातही येथून झाली होती. या खरेदी विक्री संघाचे चेअरमन राहीले असून काँग्रेसकडून सुधाकर नायब, बाबुराव देशमुख, बाबुराव नितनवरे, शरद पाटील निलंगेकर यासह आदीनी या संघाचे नेतृत्व केले आहे. राज्यामध्ये अनेक सत्तातर झाले मात्र हा संघ काँग्रेसकडेच होता. जवळपास २०५ सभासद या खरेदी विक्री संघाचे सभासद असून पहील्यांदाच बिगर काँग्रेसचे म्हणजेच भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात हा खरेदी विक्री संघ गेला आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी नवीन अशासकीय प्रशासक मंडळाची नुकतीच नियुक्ती केली असून मुख्य प्रशासक म्हणून माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे सत्यवान तात्याराव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशासक संचालक म्हणून मनोज महादेव कोळ्ळे , आण्णाराव रामचंद्र जाधव, व्यंकटगिर बुध्दगीर गीरी, मनोज व्यंकटराव पाटील, दयानंद बळवंतराव धुमाळ, विक्रांत सुधीर पाटील, भगवान व्यंकटराव जाधव, कुलदीप देशमुख यांची नव्याने निवड करण्यात आली आहे. मंगळवारी ता ९ रोजी दुपारी २ वाजता मुख्यप्रशासकृ सत्यवान धुमाळ व सर्व प्रशासकीय संचालक मंडळाने शासकीय नियमाप्रमाणे पदभार देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77-अ मधील तरतूदीन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आर. एल. गडेकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. निलंगा, यांनी निलंगा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. निलंगा या संस्थेवर नविन संचालकाची पुढील निवडणूक आदेश येईपर्यंत अथवा समितीची निवडणूक होऊन आलेल्या समितीच्या पहिल्या सभेपर्यंत यापैकी जो कालावधी कमी असेल तो पर्यंत अशासकीय प्रशासकीय मंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेशात नमुद केलेआहे. यावेळी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक प्रल्हाद वाघमारे तर कर्मचारी बाबुराव कानडे, दिपक मोगरगे, बंकट माने, रवीषझरकर, सद्दाम शेख, राजबा कुंभार आदि उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघातील अनेक शासकीय योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून गतवैभव मिळवून देऊ असे अश्वासन यावेळी नुतन मुख्य प्रशासक सत्यवान धुमाळ यानी दिले आहे.