मुंबई, 10 मे : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात भाजपचा दारून पराभव होणार आहे. कर्नाटकात भाजपला कोणताही देव पावणार नाही. कर्नाटकचा निकाल देशाला दिशा देणारा असेल. एकीकडे मणिपूर पेटलेला असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटक निवडणुकीमध्ये व्यस्त होते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटक निवडणुकीवरून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मणिपूर पेटलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कर्नाटक निवडणुकीत व्यस्त होते. कर्नाटक निवडणुकीत पैशांचा महापूर आला. मात्र तरीही या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे. कर्नाटकमध्ये भाजपला कोणताही देव पावणार नाही. शिंदे, फडणवीसांकडून कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी राऊतांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालय निष्पक्ष निर्णय देईल अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जर न्यायालयानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडं सोपावलं तर याबाबत नरहरी झिरवळ निर्णय देऊ शकतात असं राऊत यांनी म्हटलं आहे.