• Sun. May 4th, 2025

निवडणूक आयोगाने तोडले रेकॉर्ड ; कोट्यवधी रुपयांच्या वस्तू जप्त

Byjantaadmin

May 10, 2023

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यंदा निवडणूक आयोगाने २०१८ च्या निवडणुकीचं रेकॉर्ड तोडले आहे. या निवडणुकीत आयोगाने जप्त केलेल्या वस्तू ४.५ टक्के अधिक आहे. यात विविध भेटवस्तू, रोख रक्कम मद्य, अंमली पदार्थ आदींचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आयोगाने ३७५ कोटी रुपये अधिक जप्त केले आहेत.निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वीच म्हणजे ८ मे पर्यंत १४७. ४६ कोटी रुपयांची रोख रक्कम, ८३.६६ कोटी रुपयांची दारु, २३.६७ कोटी रुपयांचे औषधे. ९६.६० कोटी रुपयांच्या किमंती वस्तू, २४. २१ कोटी रुपयांच्या भेट वस्तू जप्त केल्या आहेत.

निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) मतदानाला सुरवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत प्रचाराच्या काळात भाजपा, CONGRESS धर्मनिरपेक्ष जनता दल या तिन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच कारणामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात तीन मुख्यमंत्री झाले. सध्या भाजपचे १२१ आमदार आहे, काँग्रेसकडे ७० तर जेडीएसकडे ३० आमदार आहेत.या विधानसभेसाठी काँग्रेसचे २२१, भाजप सर्व २२४, जेडीएस २०८, आम आदमी पार्टी ने २०८, बसपा १२७, समाजवादी पार्टी १४,राष्ट्रवादीचे ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत भाजपचे ३८, काँग्रेस ३६, जेडीएसचे ३१ उमेदवार एससी आहेत. काँग्रेसचे १५, जेडीएसचे २० उमेदवार मुस्लिम आहेत. भाजपचा एकही उमेदवार या वर्गांतील नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *