भोकर उपविभागात महिला आयपीएस अधिकारी शफकत आमना यांची नियुक्ती
नांदेड : राज्य सरकाने भारतीय पोलीस सेवेतील ११ अधिका-यांना सहायक पोलिस अधीक्षक पदावर नियुक्तया दिल्या आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील भोकर उपविभागात महिला आयपीएस अधिकारी शफकत आमना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट्ट यांनी काढलेल्या आदेशानुसार सन २०१८,२०१९ आणि २०२० या वर्षात भारतीय पोलीस सेवेत दाखल ११ अधिका-यांना सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पहिल्या नियुक्तया दिल्या आहेत. या नियुक्तीमध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकर उप विभागात महिला आयपीएस अधिकारी शफकत आमना यांना नियुक्ती मिळाली आहे. यापुर्वी नांदेड जिल्ह्यात निर्मला अर्जुन आणि त्यानंतर विनिता साहू यांनी काम केले आहे. शफकत आमना यांनी भूगोल या ऐच्छिक विषय घेऊन त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आहे.
तर अन्य अधिका-यांमध्ये तेगबीरसिंघ संधू (२०१८) मालेगाव शहर जि़ नासिक,धीराज कुमार बच्चू (२०१९) माजलगाव जि. बीड, अभयसिंह बाळासाहेब भोसले (२०२०), गोकुळ राजजी (२०२०) बाळापूर जि़ अकोला, आशित नामदेव कांबळे (२०२०) रामटेक जि.नागपूर ग्रामीण, श्रीमती महेक स्वामी (२०२०) वैजापूर जि. औरंगाबाद, श्रीमती नितीपुडी रश्मिता राव (२०२०) तुमसर जि़ भंडारा, पंकज अतुलकर (२०२०) पुसद जि. यवतमाळ, सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी (२०२०) धुळे शहर व एम.वी.सत्यसाई (२०२०) यानां लोणावळा जि.पुणे ग्रामीण येथे नियुक्ती देण्यात आली.