लायन्स पुरस्कार सोहळा व “उन्हातलं चांदणं “नाटकाला उदंड प्रतिसाद
लायन्स क्लब आँफ लातूर सिटी व भारती गित्ते ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थाना लायन्स -2023 गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सामाजिक उपक्रम म्हणून लायन्सने सादर केलेल्या “उन्हातलं चांदणं”या नाटकाला रशिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.दगडोजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड येथे हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन डाँ विठ्ठल लहाने यांच्या हस्हे झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लायन्यचे माझी प्रांतपाल डाँ मन्मथप्पा भांताब्रे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून.अतिरिक्त पोलीस अधिक्षक डाँ अजय देवरे.भाजपचे राज्याचे माध्यम प्रमुख नवनाथ बन.लायन्स क्लब आँफ लातूर सिटीचे अध्यक्ष डाँ धर्मवीर भारती,संयोजक अनिल पुरी.जगदीश हेड्डा.राजेश मित्तल.नागनाथ गित्ते.अँड संगप्पा परमा.सुधाकर जोगी.आदीची या वेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिनां लायन्स 2023 गौरव पुरस्काराने.सन्मानित करण्यात आले.या मध्ये बी.बी.ठोंबरे,रवि बापटले,पञकार विलास बडे,अँड शैलेश गोजमगुंडे,डाँ.विश्रांत भारती,डाँ शाम सोमाणी,डाँ अजय पुनपाळे,पोलीस अधिकारी अमोल भारती.तसेच आदर्श कार्य संस्था म्हणून.समर्पण फाउंडेशन,दिशा प्रतिष्ठान,ग्रीन लातूर वृक्ष टिम.रिलिजन टुरिस्पाँसीबीलीटी.सर्वोत्तम चँरिटेबल ट्रस्ट या संस्थेना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.अँड शैलेश गोजमगुंडे लिखीत व दिग्दर्शित “उन्हातलं चांदणं या कौटुंबिक नाटकाला रशिकांनी उदंड प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष डाँ धर्मवीर भारती यांची केले तर सुञसंचलन संयोजक अनिल पुरी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,व्यंकट ठणके.अँड योगेश शिन्दे.सुहास पाचेगावकर,मनोज देशमुख.कालिया.आदीनी परिश्रम घेतले.