लोकनेते विलासराव देशमुख यांनी ग्रामिण भागाच्या विकासासाठी सहकारी साखर कारखानाची उभारणी केली
-माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
साखर आयुक्त शेखर गायकवाड व सौ. वंदना शेखर गायकवाड यांच्या हस्ते
विलास सहकारी साखर कारखाना युनिट २ च्या साखर पोत्याचे पूजन
साखर आयुक्त गायकवाड यांनी विलास कारखानायुनिट २ च्या
६० केएलपीडी आसवानी प्रकल्पाची केली पाहणी
लातूर प्रतिनिधी : लोकनेते विलासराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामिण भागाच्या विकासासाठी सन १९८० च्या दशकात सहकारी साखर कारखानाची उभारणी केली.
त्यांच्या या दुरदृष्टी विचारामुळे, आणि नेतृत्वामुळे अनेक साखर कारखाने चांगल्या पध्दतीने कार्यरत आहेत. यासाठी त्यांनी या क्षेत्रात चांगले काम करून सहकार चळवळ व राजकारणाची वेगळी संस्कृती या भागात रुजवली आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालक मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त पुणे शेखर गायकवाड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना शेखर गायकवाड यांच्या हस्ते व माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. ८ मे रोजी दुपारी उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या युनिट २
च्या गळीत हंगाम सन २०२२-२३ मधील साखर पोत्याचे पूजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखाना परिसरात ६० केएलपीडी नवीन आसवानी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रादेशिक सहसंचालक नांदेडचे रावळ, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे
व्हा. चेअरमन रवींद्र काळे, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, रामराव बिराजदार, मनमतआप्पा किडे, प्रीति भोसले, विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ए.आर.पवार, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज
जाधव, अनंत बारबोले, सूर्यकांत सुडे, भैरवनाथ सवासे, अमर मोरे, संजय पाटील खंडापूरकर, दगडूसाहेब पडीले, अनिल पाटील, सुभाष माने, रंजीत पाटील,बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, गोविंद डुरे आदीसह कारखान्याचे खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी सहकार, साखर उदयोग आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी जोविचार मांडला त्यावर साखर आयुक्त गायकवाड यांनी चांगले काम करून
शिक्कामोर्तब केले आहे. आज ऊसापासून साखरनिर्मिती जगात केली जाते. या साखर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र पोहोचला आहे, राज्यातील बहाद्दर शेतकऱ्यांची यामागे किमया आहे. महाराष्ट्र आता विदेशी देशांशी साखर उत्पादनात स्पर्धा करतो आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी सन १९८०च्या दशकात येथे शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामिण भागाच्या विकासासाठी कारखाना सुरू केला. त्यांच्या विचारामुळे, आशीर्वादाने नेतृत्वामुळे हे सर्व साखर कारखाने चांगल्या पध्दतीने चालत आहेत. यासाठी त्यांनी चांगले
काम करून सहकार चळवळ व राजकारणाची वेगळी संस्कृती आपल्या कार्यातून याभागात रुजवली आहे, असे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, आज
सहकार चळवळीचे नेतृत्व मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख करीत आहेत, लातूर जिल्ह्याचे नाव सहकार आणि साखर उदयोगात राज्यात घेतले जाते. गेल्या वर्षी मराठवाडा विदर्भामध्ये एफआरपी मध्ये या कारखान्याने विक्रम केला तो विक्रत याही वर्षी कारखान्याने केला आहे. साखर उदयोगात जगात महाराष्ट्राचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी आपणप्रयत्नरत राहू, आपला साखर उत्पादनानातील दबदबा कायम टिकवण्यासाठी अभिनव
योजना राबवाव्या लागतील असेही त्यांनी सांगितले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आयुक्त म्हणून केलेलया कामाचे कौतूक करून त्यांनी आयुक्त म्हणून अतिशय चांगले काम केले आहे, राज्य व देशाला त्यांच्या या ज्ञानाचा, अनुभवाचा सदपयोग होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड बोलतांना म्हणाले की, अनेक साखर कारखाने आहेत पण सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत. चांगले चालणारे आणि
शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणारे साखर कारखाने म्हणून लातूर जिल्हयातील साखर कारखानाकडे पाहिले जाते असे सांगितले. यावेळी ते पूढे बोलतांना आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उदयोगात १ लाख कोटी रुपयाची उलाढाल झाली आहे. या कारखानदारीतून सामान्य शेतकऱ्याने महाराष्ट्राचे चित्र बदलले, साखर उदयोगातील सर्वांच्या परीश्रमाने राज्याचा साखर उत्पादनात प्रथम क्रमांक आला आहे. आज भारत पहिल्या क्रमांकावर तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशातील साखर उदयोगाच्यावाटचालीत महाराष्ट्र राज्याचे मोठे योगदान आहे. साखर कारखानदारी चांगली चालली पाहिजे आणि शेतकऱ्याला चांगला भावही दिलापाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आता साखर कारखाने इंधनाचे कारखाने होणार आहेत, आपण क्रूड ऑइल विदेशातून मागवतो पण ते आता येथे उसापासून तयार करीत आहोत. ऊसापासून
इथेनॉलनिर्मीतीमूळे महाराष्ट्राची ब्राझीलकडे वाटचाल सुरू झाली आहे. साखर उदयोग आता एक नंबरला आला आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि जीडीपी वाढवण्यात साखर उदयोगाने मोठी मदत केली आहे, असे त्यांनी सांगीतले.
विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी प्रास्ताविक करून नवीन आसवानी प्रकल्पाच्या कामाची व कारखान्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गूडसूरकरयांनी केले, तर शेवटी आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.