लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संभाजी ब्रिगेडच्या सक्षमीकरण बैठक संपन्न
लातूर प्रतिनिधी :-संभाजी सक्षमीकरणाचे बैठक बैठकीत बोलताना बोलताना प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सत्तारोहणासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज असल्याचे मत व्यक्त केले. राज्याच्या राजकारणात संधी असून सर्वांनी सामान्य जनतेची कामे करावीत असे आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलताना केले. कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी यांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वपूर्ण असून ताकदीनिशी लढवाव्यात असे आवाहन केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष वैजनाथ जाधव जिल्हाध्यक्ष रामहरी भिसे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाधव, महानगराध्यक्ष मिथुन दिवे संभाजी ब्रिगेड निलंगा तालुका अध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष नरसिंग पवार, तालुका अध्यक्ष बाळकृष्ण कदम, लातूर तालुका अध्यक्ष एडवोकेट नरवडे, निलंगा तालुका सचिव किशोर शिंदे, इर्शाद आलम शेख ,असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.