12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जगातली पहिल्या लोकशाही संसदेची संरचना भारतात ‘अनुभव मंटप’ या संकल्पनेतून मांडली… व्याख्याते किरण कोरे यांचे प्रतिपादन….
निलंगा/प्रतिनिधी
१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जगातली पहिल्या लोकशाही संसदेची संरचना भारतात ‘अनुभव मंटप’ या संकल्पनेतून मांडली या अनुभव मंटपात ७७० सदस्य होते. हे सदस्य रोज दिवसभर स्वतःच कर्म करायचे आणि सायंकाळी एकत्र येवून आपले विचार मांडत असतं. या विचारांवर साधक बाधक चर्चा व्हायची. या चर्चेअंती जे निष्पन्न होईल त्याला समाजमान्यता मिळायची असे प्रतिपादन व्याख्याते किरण कोरे यांनी केलं आहे.
निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा येथे बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने व्याख्याते किरण कोरे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच मोहण कुणाळे, उपसरपंच संतोष गुरगटे, पोलीस पाटील किशन खोबरे, माजी पंचायत समिती सदस्य हरीष डावरे, ओमप्रकाश शेटकार हे उपस्थित होते…
पुढे बोलताना कोरे म्हणाले की अनुभव मंटपाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन आदी विचार या समाजव्यवस्थेला १२ व्या शतकात दिले.या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी ऐतखाऊ प्रवृत्तीला प्रचंड विरोध करत कर्मप्रधान संस्कृतीचा स्वीकार केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं…. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केलं तर अनेक नागरिक उपस्थित होते….