युवा शक्ती देश शक्ती जिल्हाधिकारी -पृथ्वीराज बी.पी.
लातूर – दिनांक ०३ मे २०२३ बुधवार रोजी सायंकाळी ०९ वाजता आदर्श कॉलनी येथे ईद मिलन व सन्मान कर्तूत्वाचा सस्नेह निमंत्रण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र विकास आघाडी संस्थापक तथा मुंबई वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड अण्णाराव पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते तेव्हा सत्कार मुर्ती म्हणून पृथ्वीराज बी.पी. आपल्या मनोगतात म्हणाले की युवा शक्ती हि देश शक्ती आहे यासाठी युवकांना सोबत घेऊन देशाचं आम्ही देणेकरी आहोत हा विचार युवकांच्या मनात तयार करणं गरजेचं आहे तसेच लवकरच शिबिर आयोजित करण्यात येणार असून युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करु तसं पाहता आमच्या राजस्थान मध्ये विषय निघतो की लातूर म्हणजे भुकंप , रेल्वेने पाणी आणलेलं लातूर का हि ओळख होती आता यापुढे लातूर ची ओळख आरोग्यवर्धिनी पुरस्कार प्राप्त अशी राहिल असं मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष मा.संजीव कुमार ( DIG CRPF CAMPS ) मौलाना इसराईल रशिदी संयोजक अँड अण्णाराव पाटील, बसवंतप्पा उबाळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमास सत्कार समारंभाने सुरवात झाली तसेच पुढे बोलताना पृथ्वीराज बी.पी. म्हणाले की पुरस्कार हा प्रेरणादायी आहे या मध्ये सर्वांनी सोबतीला राहुन सहकार्य केले याचे श्रेय संबंधित सहकारी यांना दिलं तर चुकीचं ठरणार नाही पुढे म्हणाले की आरोग्यवर्धिनी’ कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी स्वीकारला पुरस्कार
जिल्ह्यातील आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ची अंमलबजावणीची तसेच आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची दखल घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री सचिवालयाचे सचिव डॉ. पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा आणि केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाचे सचिव श्रीनिवास उपस्थित होते. यावेळी लातूरसह देशभरातील 15 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रधानमंत्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला लातूरवरून गेलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, आरोग्यवर्धिनी सल्लागार सोनाली नागठाणे, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत कापसे उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत विविध आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपाचार संदर्भ सेवा इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यात 233 आरोग्यवर्धिनी केंद्रामधून आरोग्य सेवा सातत्याने दिल्या जात आहेत. यामध्ये गरोदर माता बालक, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयीच्या सेवा, संसर्गजन्य व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपत्कालिनी आरोगय सेवा, कान नाक घसा विषयक, मानसिक आजारांवरील सेवा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगा, आहार, व्यायाम यासारखे विविध उपक्रम यांचा समावेश आहे.लातूर जिल्ह्यात आरोग्यवर्धिनींच्या सेवा बळकट करण्यासाठी प्रशासनातर्फे निधीची उपलबधता करुन देणे, औषधांचा पुरवठा, अद्यावत रुग्णवाहिका यासारख्या उपाययोजना, तसेच कर्करोग निदानासाठीचे संजीवनी अभियान, मातामृत्यू रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेला जीवनरेखा कक्ष, लोकांच्या सोयीसाठी गोवोगावी आरोग्य शिबिरे आदी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
पुरस्काराने उत्साह आणि समर्पण वाढण्यास मदत : जिल्हाधिकारी लातूर जिल्ह्याने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्काराने आरोग्य विभागाचा चमू आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा उत्साह वाढला असून यापुढे सर्वजण अधिक समर्पण भावनेने काम करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. या योजनेचा जवळपास 50 लाख लोकांनी लाभ घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड अण्णाराव पाटील यांनी केले तर आभार सय्यद हारुण यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे अँड सिध्देश्वर पाटील , अँड अनुरुध्द येचाळे, उमरदराज खान, नाज़म शेख , इस्माईल फुलारी सद्दाम पठाण , चंद्रकांत हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला