वंडरवर्ल्डच्या रंगरेज फॅशन शो ला लातुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : लातूरच्या वंडरवर्ल्ड व सूनबाई दालनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगरेज फॅशन शो ला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अनोख्या फॅशन शो मध्ये लातूरसह महाराष्ट्राच्या विविध शहरातून आलेल्या एकूण ५० स्पर्धकांनी भाग घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप पाटील, डॉ. ज्योती वर्मा, वर्षा गोजमगुंडे,स्नेहा मलवाडे , माधुरी माकणीकर, तनुजा शिंदे, उज्वला मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगरेज या फॅशन शोचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षीच्या या शोचे सहप्रायोजक पीएनजी ज्वेलर्स व फर्स्ट क्राय लातूर हे होते. शिक्षणासोबतच कला, फॅशन क्षेत्रातही लातूर आघाडीवर आहे. लातूरच्या विद्यार्थी, स्पर्धकांनाही या क्षेत्रात आणखी नेत्रदीपक कामगिरी करता यावी, या उद्देशाने सलग दुसऱ्या वर्षी रंगरेज फॅशन शो चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. सोनाली ब्रिजवासी यांनी दिली. लातुरातही फॅशन आणि कलागुणांना वाव मिळावा या भावनेने सदर उपक्रमाचे आयोजन करण्याकामी आपण पुढाकार घेतला. त्याला स्पर्धक तसेच सह प्रायोजकांकडून चांगली साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उपसंचालिका माधवी जोधवानी यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली.
यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके, प्रमाणपत्र , प्रशस्तीपत्र तसेच गिफ्ट व्हाऊचर्सचे वितरण करण्यात आले.
लातूरकरांच्या सहकार्यामुळे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळाल्याची प्रतिक्रिया उमेश ब्रिजवासी यांनी व्यक्त केली. या उपक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून फेस ऑफ वंडरवर्ल्ड , फेस ऑफ सूनबाई , फेस ऑफ पीएनजी लातूर, फेस ऑफ फर्स्ट क्राय लातूरचीही निवड करण्यात आली. या शोमध्ये राखी देशपांडे, प्रतिक्षा पाटोलकर, ख़ुशी पोतदार, प्रतीक शिंदे, श्रीनाथ शिंदे, अश्विनी पाटील, आकाश मोहिते, ऋजुल देवकर, सुलभा आणि अक्षरा पाटील, नील नावंदर, नव्या भुतडा, अर्जित अग्रोया, शांती लोया, जान्हवी पाटील, ऋषिकेश नांदे, श्रेया सूर्यवंशी, पियुशा मुदगाळे , सोनल जाधव, वीर नावंदर, राजेश्वरी बनसोडे हे स्पर्धक विजयी ठरले आहेत.
वंडरवर्ल्डच्या रंगरेज फॅशन शो ला लातुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
