बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी (CBI) मंगळवारी (2 मे) मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वॉटर अँड पॉवर कंसल्टंसी (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता यांच्या घरावर सीबीआयनं छापेमारी केली. छापे टाकून सीबीआयनं तब्बल 20 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत.
जलशक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Water Power) माजी सीएमडीच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. दिल्ली आणि चंदीगडसह देशभरातील त्यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. छापेमारीत 20 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. अशा प्रकारे या छाप्यात एकूण 20 कोटी रुपयांची रोकड आणि अनेक प्रकारची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपी राजेंद्र कुमार गुप्ता हे वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी (WAPCOS) मध्ये सीएमडी म्हणून काम करत होते. हा विभाग जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत होता.
सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेसाठी गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम सोनीपतआणि गाझियाबादसह सुमारे 19 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान, 20 कोटी रुपयांच्या रोखी व्यतिरिक्त, आम्ही मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त केल्या आहेत.
सुटकेस आणि बेडमध्ये रोख रक्कम ठेवल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. सीबीआयने छापेमारीत तपास केला असता त्यांना ही रोकड घरातच सापडली. सीबीआयनं यासंदर्भात बोलताना सांगितलं की, पुढील तपास सुरू असून हा पैसा कुठून आला याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे सर्व समोर आल्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्याची कागदपत्रं, दागिने आणि डिजिटल उपकरणं असे सुमारे 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सध्या तपास सुरू आहे. WAPCOS च्या माजी CMD विरुद्धचा आरोप असा आहे की, त्यांच्याकडे 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2019 या कालावधीत त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता होती.
दरम्यान, वाप्कोस (WAPCOS) हे जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सरकारच्या मालकीतील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे पूर्वी ‘वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (WAPCOS Water & Power Consultancy India) म्हणून ओळखलं जात असे.