महाराष्ट्र दिनानिमित्त निलंगा येथे 103 रक्तदात्यांनी केले रक्तदान
निलंगा :- 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त निलंगा येथे स्वराज्य सेवाभावी संस्था च्या वतीने दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेण्यात आले. दरवर्षीप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षांपासून ची रक्तदानाची परंपरा कायम राखत या यावेळी 103 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिराची उद्घाटन प्रथमता हरीकिशोर चंद्रीकाप्रसादसिंह , प्रा.गजेंद्र तरंगे, व मीनाक्षी पांडे यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. तर अमिता नारायणपुरे, मधुबाला नारायणपुरे, अश्विनी म्हेत्रे, प्रियंका जाधव, राजर्षी सोरडे, सरस्वती शाहीर अदी महिलासह 103 जणांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. तर रक्तदान शिबिरास माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ लालासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शिवसेनेचे ईश्वर पाटील, काँग्रेसचे अजित माने, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे डी एस धुमाळ, आनंद जाधव , विनोद आर्य ,प्रल्हाद बाहेती अदीसह मान्यवरांनी भेट दिली. भालचंद्र रक्तपेढीचे कर्मचारी राजेश्वर गजभास्कर, दिगंबर पवार, किशोर पवार, संतोष पाटील, रेखा गवळी, जयप्रकाश सुर्यवंशी, फरहान शेख, अरुण कासले, पूजा शिंदे, सुरेखा हजारे, राजकुमार गायकवाड, अन्सार शेख आदींनी रक्त संकलनाचे कार्य केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युवराज पाटील किशोर दूधनकर अर्जुन पाखरसांगवे, गणेश शाहीर, गोविंद इंगळे यांनी परिश्रम घेतले सर्व रक्तदात्यांचे स्वराज सेवाभावी संस्था अध्यक्ष दत्ता शाहीर यांनी आभार मानले.
स्वराज्य सेवाभावी संस्था मार्फत महाराष्ट्र दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन प्रा. गजेंद्र तरंगे व हरिकिशोर चंद्रिका प्रसादसिंह यांनी रक्तदान करून केले यावेळी डॉ लालासाहेब देशमुख, दत्ता शाहीर, दिगंबर पवार दिसत आहेत