गेल्या काही दिवसांपासून भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच बीआरएसने के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी सभा घेतल्या आहेत
आता शनिवार (ता.6) पासून बीआरएस पक्षाने महाराष्ट्रभर जनजागरणाची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिनाभर बीआरएसच्या राजकीय ध्येय धोरणाच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसापर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याचे काम या मोहिमेच्या माध्यमातून केले जाणार आहे.बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मराठवाड्यात सभा घेऊन पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. पहिल्या टप्प्यात सभा व काही नेते मंडळीच्या मदतीने केसीआर यांनी स्वतः पायाभरणी केली. त्यानंतर पक्षाची भूमिका मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने मराठीतच प्रचार मोहिम हाती घेतली आहे.
केसीआर यांचे जावई तथा telgana अर्थमंत्री टी हरीश राव यांनी या मोहिमे संदर्भात पत्रकारांना माहिती दिली. महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी BRS (बीआरएस) प्रयत्न सुरू आहेत.6 मे पासून सोलापूरसह maharashtra तील प्रत्येक खेड्यापाड्यात, वाड्या -वस्त्यांवर तेलंगणा सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रचार वाहने फिरणार आहेत. 6 जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.