• Tue. Apr 29th, 2025

शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याला गुजराती पेपर; बीडमध्ये धक्कादायक प्रकार

Byjantaadmin

Apr 30, 2023

बीड: बीड जिल्ह्यात नवोदय परीक्षेत जिल्हा परिषदेच्या एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे नवोदयच्या पात्रता परीक्षेला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ उडाला आहे. यात पालकांनी विचारलेल्या प्रश्नावर चुकून झालं असं उत्तर शिक्षक आणि मुख्याध्यापक देत आहेत.

beed 1

जिल्ह्यातील शिरूर कासार येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कालिका देवी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय पात्रता परीक्षा घेण्यात आल्या. त्यात खोकर मोहा येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा पात्रता परीक्षा फॉर्म भरताना शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमात फॉर्म भरल्याने संदीप मुळीक नावाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमाच्या प्रवेशपत्राबरोबर गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आली. विद्यार्थ्याला शिक्षकांच्या चुकीमुळे तोच पेपर सोडवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार पालकांमुळे उघडकीस आला.

मुलाला गुजराती भाषेतील पेपर आल्यानं पालकांनी याबद्दल मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. त्यावर मुख्याध्यापक राम वाघुंबरेंनी उलट उत्तरे दिली. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. कोणाकडे जायचे असेल तिथे जा, अशा उत्तरामुळे पालक पूर्णपणे गोंधळून गेले. गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिकेमुळे विद्याथ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक विवंचनेत आहेत.

ज्यावेळेस नवोदयची परीक्षा सुरुवात तिचे फॉर्म भरण्याची वेळ होती, त्यावेळेस शिक्षकांनी निष्काळजीपणा केला. फॉर्म भरताना मराठी माध्यमाऐवजी गुजराती माध्यम लिहिले. त्यामुळे विद्यार्थ्याला गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिका मिळाली. गुजराती भाषा येतच नसल्याने विद्यार्थ्याला काय करावे तेच कळेना. याबद्दल मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापकांना विचारले असता, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा असे उत्तर त्यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed