• Tue. Apr 29th, 2025

राज्यात बाजार समित्यांच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीची सरशी; महायुती दुसऱ्या स्थानावर

Byjantaadmin

Apr 29, 2023

राज्यातील 147 पैकी 76 KRUSHI UUTPAN BAZAR SAMITI महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय (सायंकाळी 5 पर्यंतची आकडेवारीनुसार) प्राप्त झाला आहे. सत्तेसाठी काही पण म्हणून सर्वपक्षीय आघाड्यांनी सुद्धा 24 ठिकाणी विजय मिळवत मोठी मजल मारली आहे. राज्यातील बहुतांश नेत्यांनी आपापले बाजार समित्यांमध्ये गड राखले आहेत.

Bajar Samiti Election Mahavikas Aghadi ahead in the battle of market committees in the maharashtra  ruling bjp shinde faction Alliance on second position Bajar Samiti Election : राज्यात बाजार समित्यांच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीची सरशी; महायुती दुसऱ्या स्थानावर, सर्वपक्षीय आघाड्यांचीसुद्धा अनेक ठिकाणी चलती! 

दरम्यान, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भूसे यासारख्या नेत्यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. काही ठिकाणी सत्तेसाठी निर्माण झालेल्या अभद्र युत्यांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश उमटलं आहे. विदर्भातील रामटेक, नागपूरमधील सुनिल केदार, आशिष जायस्वाल यांच्या अभद्र युतीला त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पॅनलने केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीने बाजी मारली. नगरमध्ये विखे पाटील गटाला बाळासाहेब थोरातांनी धक्का देत भोपळाही फोडू दिला नाही.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे निकाल

  • LATUR CONGRESS MLA AMIT DESHMUKH
  • AUSA BJP MLA ABHIMANYU PAWAR
  • UDGIR MVA
  • मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या ‘ आपलं पॅनल ‘ ला धक्का देत शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब पॅनल विजयी.
  • भंडारा : नाना पटोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसला जेमतेम यश
  • नंदुरबार : मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या भावाचा पराभव..
  • बारामती : सर्वच्या सर्व 12 जागांवर राष्ट्रवादीचा कब्जा करताना सत्ता राखली आहे.
  • दौंड : संजय राऊतांच्या आरोपांनंतरही दौड बाजारसमितीत आमदार राहुल कुल यांचा दणदणीत विजय झाला आहे.
  • भुसावळ जळगाव : बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भुसावळमध्ये धक्का बसला आहे. भुसावळमध्ये 18 पैकी 15 जागांवर भाजप सेनेचा विजय झाला आहे.
  • दिग्रस, यवतमाळ : अन्न व औषधी प्रशासनमंत्री संजय राठोड यांना धक्का बसला आहे, तर नेरमधे माजी मंत्री माणिकराव ठाकरेंना धक्का  बसला.
  • इस्लामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला.
  • नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचा धुवा, 18 पैकी 17 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपले वर्चस्व ठेवले कायम बाजार समिती निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित पॅनलला खातेही उघडता आले नाही.
  • नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या भगवा फडकला. 18 पैकी 17 जागांवर एक हाती शिवसेनेचे सत्ता तर एका जागेवर अपक्ष उमेदवार यांचे वर्णी लागली. भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या भावाचा पराभव.
  • मालेगाव : मंत्री भुसेंना धक्का, बाजार समिती अद्वय हिरेंकडे, 11 पैकी 10 जागांवर ‘ कर्मवीर भाऊसाहेब हिरे ‘ पॅनल विजयी.
  • संगमनेर : बाजार समितीवर बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व सिद्ध, 18 पैकी 18 जागा जिंकून महाविकास आघाडीचा विजय. भाजपचे विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवला विजय.
  • परळी : धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना धोबीपछाड. कृषी उत्पन्न बाजार समिती 18 पैकी 11 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय. सेवा सहकारी सोसायटी विभागातील 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस नि जिंकल्या भाजपाला अद्याप एकही जागा जिंकता आली नाही.
  • अमरावती : बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांनी झेंडा फडकवला, आमदार रवी राणा यांना मोठा धक्का रवी राणा यांचे मोठे बंधू सुनिल राणा यांचा ही बाजार समिती निवडणुकीत पराभव. रवी राणा यांच्या पॅनलमधून एकही उमेदवार विजयी झाला नाही.
  • जळगाव : जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजपचे शेतकरी सहकारी पॅनलचा सर्व 18 जागांवर एकहाती विजय.
  • नांदेड  : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आघाडीची  सत्ता कायम. 18 पैकी 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी विजयी. काँग्रेस 13 तर 2 जागांवर राष्ट्रवादी विजयी. अशोक चव्हाण यांचा गड शाबूत. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसला आहे. भाजप-शिंदे गटाला धक्का. भाजपाला केवळ ३ जागा, तर पहिल्यांदा निवडणुक लढवबाऱ्या बीआरएसला भोपळा हाती आला आहे.
  • ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 18 पैकी 15 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपनं 3 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed