सिरसी हंगरगा येथील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश
आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवून केला शेकडो कार्यकर्ते भाजपात
माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून निलंगा तालुक्यातील सिरसी हंगरगा येथील असंख्य कार्यकर्ते व पॅनल प्रमुख प्रशांत नकाते, सोसायटीचे चेअरमन राजकुमार रेड्डी, व्हा. चेअरमन गुणवंत कोळेकर, संचालक मंडळावरील विश्वनाथ भालके, बाबू शेख, प्रशांत सुगावे, तानाजी पाटील , यशवंत पाटील, यशवंत शेळके, भगवान रेड्डी, मारूतीजी इरले, मोहनजी दंडे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश दंडे, भरत भालके, भानुदास सराटे, प्रमुख कार्यकर्ते श्रीधर शेळके, कुमार देवनुरे, सतिष देवनुरे, सुरेश कोळेकर, भगवान जाधव, तानाजी इरले जी, बालाजी टाकळे , पदमाकर रेड्डी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपा तालुकाउपाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
१ व २ जूनला रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे