व्हि.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी मध्ये परिसंवाद कार्यक्रम संपन्न
“गतिशील करिअरसाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्व” या विषयावर तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लातूर प्रतिनिधी- विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, अंतर्गत चालणाऱ्या व्हि.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी लातूर या महाविद्यालयात बी.फार्मसी आणि एम.फार्मसी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संभाषणकौशल्य, राहणीमान, भाषेवरील प्रभुत्व तसेच सॉफ्ट स्किल या विषयावर माहिती देण्यासाठी नुकताच “गतिशील करिअरसाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्व” परिसंवाद कार्यक्रम पार पडला.
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.राहुल बुलानी यांनी परिसंवादाच्या माध्यमातून भविष्यात व्यवसायामध्ये इतरांसोबत काम करण्याची क्षमता कशी सुधारता येईल, या करिता सॉफ्ट स्किल चे आवश्यक ज्ञान अवगत असणे गरजेचे असते, आपण करत असलेल्या व्यवसायात अथवा नौकरित आपले करिअर घडविण्यासाठी समोरच्यावर सकारात्मक प्रभाव कसा पाडायचा या बाबत सविस्तरपणे माहिती त्यांनी यावेळी दिली. यासोबतच विद्यार्थ्यानी व्यवसाय अथवा नौकरी करताना आपले संभाषण कौशल्य, राहणीमान, भाषेवरील प्रभुत्व कशा प्रकारचे असायला हवे हे देखील यावेळी “गतिशील करिअरसाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्व” या परिसंवादातून उपस्थित विद्यार्थ्यांना तज्ञाकडून अवगत करून देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.वाकुरे, कार्यक्रम समनव्यक प्रा.श्री.एस.एन.गादा, यांच्यासह प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.