लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा नगर परिषदातील स्वच्छतेसाठी सहा इलेक्ट्रिक घंटा गाड्याचा लोकार्पण सोहळा संपन्न
लातूर ( जिमाका) जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आय.सी.आय.सी.आय.फाउंडेशन च्या माध्यमातून देण्यात आलेल्या सहा इलेक्ट्रिक घंटा गाड्याचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व आयसीआयसीआय फाउंडेशन च्या झोनल हेड मोनिका आचार्य यांच्या हस्ते संपन्न झाला.
आयसीआयसीआय फाउंडेशन च्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेसाठी गाड्यांची गरज लक्षात घेऊन निलंगा नगर परिषदेसाठी चार तर औसा
नगर परिषदेसाठी दोन इलेक्ट्रिक घंटा गाड्या देण्यात आलेल्या आहेत. शहराच्या स्वछतेसाठी या गाड्याची मोठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला आयसीआयसीआय बँकेचे विभागीय प्रमुख दुबे , फाउंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक दिपक पाटील , मनिष खेडकर, नगर परिषदचे मुख्यधिकारी अजिंक्य रणदिवे, गजानन शिंदे , फाउंडेशन चे सोमनाथ स्वामी, बालाजी इंगळे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.