लिंगायत समाजाने केला आ.संभाजी पाटील निलंगेकरांचा भव्य सत्कार
महात्मा बस्वेश्वराचा पुतळा एक इंचही हलू देणार नाही दिला होता शब्द
लातूर जिल्ह्याचे माजी पालक मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी महात्मा बस्वेश्वराचा पुतळा एक इंचही हलू देणार नाही असा शब्द दिला होता. यांचा निलंगा शहर तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचाराच्या अनुयायाच्या वतीने सत्कार करण्यात आला…
जनमताचा आदर करून व लातूर जिल्ह्याच्या विकास कामात अडथळा निर्माण होणार नाही या सर्व बाबी लक्षात घेऊन लातूर येथील जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा एक इंच बर ही दुसरीकडे हलवला जाणार नाही असे आश्वासन दिनांक ४ रोजी लातूर शहरातील लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर विचाराच्या सर्व जनतेला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले होते.
गेल्या अनेक वर्षांपूर्वी लातूरच्या ऐतिहासिक शहरात थोर समाज सुधारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा भव्य अश्वरूढपुतळा उभारावा असा महात्मा बसवेश्वर प्रेमी जनतेची मागणी होती यावर लातूर जिल्ह्यात अनेक पद्धतीने राजकारण करण्यात आले व महात्मा बसवेश्वरांचा पुतळा मुख्य ठिकाणी होऊ नये यासाठी देखील त्या काळामध्ये अनेक प्रकारे विरोध काही लोकांनी केला तरी देखील अनेक प्रकारच्या विरोधाला व संकटावर मात करून हा असा भव्य दिव्य पुतळा कव्वा रोड चौकात उभारण्यात आला याचा इतिहास पूर्ण लातूर जिल्ह्यातील जनतेला माहीतच आहे.
लातूर शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे विकासाच्या नावाखाली पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वर महाराज विचाराच्या विरोधी लोकांनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवण्याचा डाव काही अधिकाऱ्याला हाताशी धरून चालवला होता.
शहरातील महात्मा बसवेश्वर प्रेमी जनतेने लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची लातूर येथील निवासस्थानी चार एप्रिल रोजी भेट घेतली व महात्मा बसवेश्वराचा पुतळा विकासाच्या नावाखाली इतरत्र हलवू नये , अवमान होणार नाही यासाठी आपण योग्य तो शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
शिष्टमंडळास आश्वासित करण्या अगोदर आ.संभाजीराव पाटील निलंगेकर शिष्टमंडळास आश्वासित केले की, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे शासन आहे त्यामुळे मी शासन दरबारी पाठपुरावा करेन वेळ पडली तर रस्त्यावर उतरेन संघर्ष करेन पण आहे त्या ठिकाणाहून महात्मा बसवेश्वराचा पुतळा एक इंच ही दुसरीकडे हलवला जाणार नाही असे सांगितले.
या विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या विषया संदर्भाची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, नवी दिल्ली, जिल्हाअधिकारी लातूर यांच्याशी चर्चा करून घेतली. व देशाचे रस्ते वाहतूक मंत्री, नितीन गडकरी ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,यांच्याशी दूरध्वनी संपर्क साधून अशी विनंती केली की आमच्या भागातील महात्मा बसवेश्वर प्रेमी जनतेचा, लिंगायत समाज बांधवांच्या जनमताच अदर करून व लातूरच्या विकासात अडथळे होणार नाही असा मार्ग काढावा व महात्मा बसवेश्वरांचा पुतळा एक इंचभर ही दुसरीकडे हटवू नये अशी विनंती केली. आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी लातूर कर जनतेच्या भावनेचा आस्थेचा आदर करून जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा कुठेही दुसरीकडे हलवला जाणार नाही तसेच लातूरच्या विकासासाठी( राष्ट्रीय महामार्गा साठी) पर्यायी बाबीचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते.
त्यानंतर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी चर्चा करून लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मग्गे, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाचे व महात्मा बसवेश्वर अनुयायांचे शिष्टरमंडळाने देशाचे रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी भेट घेऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली असता गडकरी या शिष्टमंडळास जनमताचा आदर करून व भारतीय जनता पार्टी व सर्व समाज बांधवांच्या मागणीचा विचार करून महात्मा बसवेश्वरांचा पुतळा एक इंच वरील हलवला जाणार नाही असे आश्वासन दिले.
त्यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर अनुयायी व जनता सुटकेचा श्वास टाकला आहे.
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचाराशी व लिंगायत समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकणारे जनमताच आदर करणारे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा निलंगा येथे सर्व लिंगायत समाज बांधवांच्या व महात्मा बसवेश्वर विचार अनुयायाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती शहराध्यक्ष अडवोकेट वीरभद्र स्वामी समाजातील ज्येष्ठ नेते शिवाजी रेशमे गुरुजी, विजयकुमार कानडे, काशिनाथप्पा आग्रे, सिद्रामप्पा सोरडे, श्रीशैल बिराजदार , संतोष सोरडे, डॉ. विक्रम कुडुंबले, ॲड. वीरभद्र स्वामी, इंजिनिअर एम.के.कस्तुरे, राजकुमार चिकराळे, सांबप्पा शेटकार, रत्नेश्वर गताटे, धनराज स्वामी, मनोज कोळळे, संजय निला, शिवप्पा पाटील, सोमनाथ धर्मशेट्टी, सुरेश सोरडे, डॉ.मन्मथ गताटे, नवनाथ कुडूंबले, रवी फुलारी, प्रशांत सोरडे, विश्वनाथ मंठाळे, संजय फुलारी, बसवराज सोरडे, प्रकाश सोलापुरे, सतीश चाकोते, डॉ.साईनाथ कुडुंबले, महेश चाकोते, निजगुण सोरडे, बसवराज स्वामी, महेश सलगरे , धनराज निला, महात्मा बसवेश्वर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.