जागृती शुगरकडून एफ.आर. पी 2722 रूपये मेट्रिक टन प्रमाणे उसाचा अंतीम भाव जाहीर
एफ.आर.पी पेक्षा अधिक दहा रूपये मेट्रिक टन शेतकऱ्यांना अधिक भाव
एफ.आर.पी प्रमाणे अंतिम भावाची राहिलेली रक्कम २० कोटी ३५ लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
लातूर :-जागृती शेतकऱ्यांची प्रगती या ब्रीदवाक्या प्रमाणे मराठवाडा व विदर्भ राज्यात खाजगी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याने चालु गाळप हंगामात ६ लाख ३२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून चालु हंगामात १५१ कोटी ६८ लाख २४० रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांना अदा केली आहे व्ही एस आय पुणे यांनी आज कारखान्याचा अंतीम उतारा ११.६१९% इतका निश्चित करून दिलेला आहे चालु हंगामात २२००/ रूपये मेट्रिक टन प्रमाणे पहिल्या हप्तापोटी १३९ कोटी ४ लाख २२० रूपये तर दुसरा हप्ता २०० रुपये प्रमाणे १२ कोटी ६४ लाख असे एकूण १५१ कोटी ६८ लाख २४० रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत आज एफआर पी प्रमाणे 2722 रुपये प्रति टन अंतीम दर जाहिर करण्यात आला असून आज काढलेले बिल 322 रूपया प्रमाणे २० कोटी 35 लाख ४ हजार रुपये उस उत्पादक शेतकऱ्यांना खात्यावर अदा केले आहेत अशी माहिती कारखान्याकडून देण्यात आली आहे
*एफ आर पी पेक्षा दहा रूपये मेट्रिक टन उसाला भाव अधिक*
राज्याचे माजी मंत्री जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या जागृती शुगर ने चालु हंगामात एफ.आर .पी पेक्षा अधिक दहा रूपये मेट्रिक टन जास्तीचा भाव देण्यात आला आहे
यामुळे देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, चाकुर, उदगीर, लातूर,औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
*उस उत्पादक शेतकऱ्यांनी खात्यावरील जमा रक्कम घ्यावी*
जागृती शुगर कारखान्याकडून चालु गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतीम भाव एफआरपी प्रमाणे २० कोटी 35 लाख रुपये रक्कम खात्यावर वर्ग केली आहे
उस पुरवठा करणाऱ्या उस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे बिल खात्यावरून घ्यावे असे आवाहन जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले देशमुख,जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे सरव्यवस्थापक गणेश येवले कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे