बसपूर खडकउमरगा येथील असंख्य कार्यकर्ते भाजपात
युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली घेतला प्रवेश
निलंगा:-महाविकास आघाडीच्या भ्रष्ट आणि बेजबाबदार कार्यशैलीमुळे राज्यातील नागरिक आणि विशेषत: शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे, अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे आशेने पाहिले जात आहे. परिणामस्वरूप बसपूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी व खडकउमरगा गावातील ग्रामपंचायत सदस्यानी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन भाजपा पक्षात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून काँग्रेसच्या तरूणांच्या मुख्य फळीने प्रवेश केल्याने बसपूर खडकउमरगा येथे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
यावेळी भाजपा पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा माजी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिध्देश्वर बिराजदार बसपुरकर, माजी सरपंच बालाजी कदम , बबलू चव्हाण, विलास पाटील, अंबादास कांबळे, तुकाराम काळगे, काशिगीर गिरी, बालाजी कांबळे , दशरथ कांबळे, महादेव कांबळे, वाघंबर सूर्यवंशी, विनायक कांबळे, सचिन कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, विनायक कांबळे, उद्धव कांबळे, मनोज कांबळे, समाधान बिराजदार, व्यंकट बिराजदार, हनुमंत नरवटे, परमेश्वर बिराजदार, सुनील कुमठे, गोविंद बिराजदार, विशाल कांबळे, गौतम कांबळे, दिनकर कदम यांच्यासह खडकउमरगा ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.