• Wed. Apr 30th, 2025

जवाहर नवोदय विद्यालया, लातुर येथील माजी प्राचार्य. जी. रमेश राव सरांचा सेवानिवृत्तीनिमीत्त माजी विद्यार्थीतर्फे सत्कार

Byjantaadmin

Apr 27, 2023
जवाहर नवोदय विद्यालया, लातुर येथील माजी प्राचार्य. जी. रमेश राव सरांचा सेवानिवृत्तीनिमीत्त माजी विद्यार्थीतर्फे सत्कार
लातुर:-जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथील माजी प्राचार्य & जवाहर नवोदय विद्यालया, मेदक ( हैद्राबाद ) येथील प्राचार्य. आदरणीय जी. रमेश राव सर हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे लोकप्रिय प्राचार्य म्हणून नवोदय परिवारात सदैव स्मरणात राहतील. राव सरांनी 1986 पासुन ते 2023 पर्यतच्या सर्वच माजी विद्यार्थी यांना आदराची व सन्मानपुर्वक वागणुक दिली. आमच्या नवोदय परिवारातील सर्वाच्या सुख दुखा:त सर स्वतः अनेकवेळा सहभागी झालेत या वरून सरांच्या मनाचा मोठेपणा व माणुसकी दिसुन येते.सर लातूर नवोदया विद्यालयामध्ये आँंगस्ट 2016 पासुन ते आँंगस्ट 2022 पर्यत प्राचार्य पदावरती कार्यरत होते त्यानंतर त्यांची बदली होऊन  जवाहर नवोदय विद्यालया, सिध्दीपेठ, मेदक ( हैद्राबाद ) या त्यांच्या मुळ राज्यात बदली झाली आहे. पदभार स्वीकारल्यापासुन ते बदली होईपर्यत जवाहर नवोदय विद्यालय, लातूर च्या सर्वागिण विकासासाठी सरांनी महत्त्व पुर्ण योगदान दिले आहे. तसेच विद्यार्थी उपयोगी अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 39 वर्षाच्या  सेवेत सतत प्रयत्नशील राहिलेत.. सरांना भावी आयुष्यासाठी लातुर परिवारातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हैद्राबाद विभागाचे जवाहर नवोदया विद्यालया समितीचे आयुक्त टी. गोपालकृष्णा यांच्या प्रमुख उपस्थीतीत विद्यार्थ्यानी वाजतगाजत मिरवणुक काढुन सपत्नीक सत्कार करुन माजी विद्यार्थी, लातुर यांच्या वतीने हद्दयपुर्वक निरोप देण्यात आला..
 यावेळी डाँं.सुवर्णा कोरे,शिरुर अनंतपाळ येथील नगरसेवक.सुधीर लखनगावे, प्रा. गंगासागर आचार्य,डाँं.मधुकर गायकवाड, डाँं.शिला भोंग-पाटील,प्रा.सुषमा थोरात,विनायक पवार,प्रा.गणेश ठाकुर,हनमंत सावंत,प्रा.अर्चना स्वामी,बालाजी खोंडे,जयप्रकाश चिमनचोंडे,शिवशंकर मुळे,प्रा.माया आणीगुंठे,कुलदीप पिल्लेवाड यांच्यासह 1986 च्या पहिल्या बँंचपासुन ते 2023 पर्यतचे विवीध श्रेत्रात कार्यरत असणारे विद्यालयाचे माजी विद्यार्थी,नातेवाईक,कर्मचारी मोठ्या संस्थेने निरोप समारंभ कार्यक्रमाला जवाहर नवोदय विद्यालय,मेदक हैद्राबाद परिसरात ऊपस्थीत होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed