• Wed. Apr 30th, 2025

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, खोपोली एक्झिटजवळ १२ गाड्या एकमेकांवर धडकल्या

Byjantaadmin

Apr 27, 2023

नवी मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ १२ वाहनांचा भीषण अपघात झाला. सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर काही जण जखमी झाले असल्याचे समजते. या भयंकर अपघातानंतर दृतगती महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

Mumbai Pune Express Way Khopoli Accident 900

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तसेच स्थानिक नागरिक देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठ्या पद्धतीने सहकार्य करत आहेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. मात्र आजचा हा अपघात भयानक होता. सर्वात पुढच्या वाहन चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे.खोपोली एक्झिट जवळील उतरणीच्या भागात गाड्या वेगात येत असल्यामुळे सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार धडकल्या. काही गाड्या एकमेकांवर आढळल्या, तर काळ्या रंगाची एक गाडी दुसऱ्या गाडीवर चढलेली होती. सुदैवाने या भयानक अपघातात अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नाही.

गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed