लातूर( प्रतिनिधी) : २५ एप्रिल २०२३माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सूचना दिल्यानंतर औसा रोड वरील वाडा हॉटेल पासून बार्शी रोडवरील पीव्हीआर चित्रपट गृहापर्यंतच्या वळण रस्त्यावरील स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त करून चालू करण्यात आले आहेत.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूरहून चिकुर्डा येथे कार्यक्रमसाठी जात असताना वाडा हॉटेल पासून पीव्हीआर चित्रपटगृह, बार्शी रोड पर्यंत वळण रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भाने त्यानि राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी संपर्क करून स्ट्रीट लाईट बंद असल्याच्या कारणाबाबत विचारणा केली तसेच माहिती घेतली आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करून सदरची स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी या सूचनांची दखल घेत तातडीने दुरुस्तीची कार्यवाही केली असून एकाच दिवसात वाडा हॉटेल पासून पीव्हीआर चित्रपट गृहापर्यंत संपूर्ण स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आली आहे. सूचना मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही केल्याबद्दल आमदार अमित देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक करून आभार मानले आहेत.या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच जवळपासच्या परिसरातराहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी स्ट्रीट लाईट चालू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.