राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे-पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पाया पडताना दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळालं आहे.

सोलापूरमधील कुंभारी येथील मेडीकल कॉलेजच्या परिसरात श्रीमती कमलाबेन पटेल, नर्सिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाला पोहोचताच विखे पाटील यांचे स्वागत सुशीलकुमार शिंदे यांनी केले. यावेळी आदराने विखे पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे हे चित्र पाहून उपस्थित मान्यवर देखील अचंबित झाले.
या कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे होते. तर याच कार्यक्रमाला सुशिलकुमार शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील,PRANITI SHINDE माजी आमदार नर्सिंग मेंगजी यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी विखे पाटील यांचे गुणगान गायले.
SHUSHILKUMAR म्हणाले, ”राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. अतिशय हुशार व सौम्य आहेत. पण निर्णयामध्ये कणखर आहेत, असं म्हणत त्यांनी विखे पाटलांचे कौतुक केलं.
पुढं ते म्हणाले,”बाळासाहेब विखे पाटील हे माझ्यासोबत युती सरकारमध्ये होते.MAHARASHRATA देखील होतेVIKHE PATIL देखील माझ्यासोबत राज्य सरकार मधील मंत्रिमंडळात होते. त्यामुळे विखे परिवाराला जवळून पाहिलं आहे. त्यांनी प्रवरामध्ये मेडिकल कॉलेज चालवलं आहे. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुख्य भाग आहे, असंही ते म्हणाले.