निलंगा येथे आज पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा
मतदार संघातील युवकाना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आ.निलंगेकर यानी उचले पाऊल
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी मतदार संघातील युवकांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे अवाहन अरविंद पाटील निलंगेकर यानी केले आहे.
सुशिक्षित व बेरोजगार तरुणांच्या जीवनात रोजगाराच्या रूपाने एक नवीन पहाट आणण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ निलंगा येथील आयटीआय मध्ये आज आयोजित करण्यात येत आहे.
निलंगा मतदारसंघाचे आमदार माजी मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चा लातूर यांच्या पुढाकारातून आपल्या निलंगा मतदारसंघात हा महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. आसुशिक्षित व बेरोजगार तरुणांच्या जीवनात रोजगाराच्या रूपाने एक नवीन पहाट आणण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे.
या मेळाव्यात २ हजार तरुणांना जॉबकार्ड देण्यात येणार आहेत. तसेच व्यवसाय, स्वयंरोजगार व नोकरी संबंधी प्रशिक्षण तसेच सरकारी योजनांमधून अर्थसहाय्य मिळविण्याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी आपल्या मतदारसंघातील निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्व तरुण तरुणींनी या महामेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर, व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा, यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” व “मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष” निमित्य आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठीक ९ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) शिरशी मोडच्या बाजूस निलंगा, ता. निलंगा, जि.लातूर. या महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या महारोजगार मेळाव्यात रोजगार देणारे उद्योजक हे लातूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण, आस्थापना /उद्योजक यांनी एकूण ४३५ रिक्तपदे अधिसुचित केली आहेत. प्रमूख आस्थापना / उद्योजक ,साई श्रद्धा इंटरप्राइजेस पुणे, ट्रेनी २५ जागा, पात्रता, १० वी/१२ वी/ कोणतीही पदवी,टाटा स्ट्रीव्ह पुणे, ऑटोमोटिव्ह कंन्सटंट/ऑटोमोटिव्ह टेक्नीशीअन टुव्हिलऱ ॲन्ड फोर व्हिलर, १०० जागा, पात्रता १० वी /१२ वी/ कोणतीही पदवी /आय.टी.आय.सर्व ट्रेड निट लि.मुंबई, (आयसीआयसीआय बँक) रिलेशनशिप मॅनेजर ५० जागा पात्रता कोणतीही पदवी, धुत ट्रान्समिशन औरंगाबाद, ट्रेनी ऑपरेटर १०० जागा, पात्रता १० वी/ १२ वी/ एमसीव्हीसी / आय.टी.आय. सर्व ट्रेड /डिप्लोमा/ कोणतीही पदवी, जस्ट डायल लि.लातूर, मार्केटिंग, १० जागा, पात्रता १२ वी, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. लातूर, फील्ड ऑफिसर ३० जागा ,पात्रता १२ वी/ कोणतीही पदवी /ड्रायव्हिंग लायसन्स, एचडीएफसी लाईफ लातूर, फायनाशिअल कंन्सटंट १० जागा, पात्रता १० वी/१२ वी/ कोणतीही पदवी एडयु प्लांट इंन्फोटेक लातूर, फॅकल्टी टिचर जागा पात्रता १२ वी/ कोणतीही पदवी, आयआयएफएल समस्ता फायनान्स लातूर फिल्ड ऑफिसर / ब्रांच क्रेडिट मॅनेजर / ब्रांच मॅनेजर ५० जागा, पात्रता १२ वी / कोणतीही पदवी / ड्रायव्हिंग लायसन्स, १० लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लातूर एलआयसी एजंट ३० जागा पात्रता १० वी / १२ वी / कोणतीही पदवी तसेच जिल्हयातील इतर प्रमुख आस्थापनांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
या नामांकीत कंपन्यांनी रिक्तपदे अधिसुचित केली आहेत. यासाठी १० वी / १२ वी / पदवीधर/ पोस्टग्रॅज्युएट/ आय.टी.आय. सर्व ट्रेड/डिप्लोमा तसेच इतर व्यावसायीक शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
वरील सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय काॕलेज निलंगा, ता.निलंगा, जि.लातूर.येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम/बायोडाटा/पासपोर्ट फोटो सह उपस्थित रहावे. व यासुवर्णसंधीचा निलंगा मतदार संघातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे अवाहन भाजपा प्रदेश सरचिटनिस अरविंद पाटील निलंगेकर यानी केले आहे.
****