विरोधी पक्षनेते अजित पवारbjp जाणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यावरुन अजित पवार यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या राजकारणातील फोडाफोडीच्या चर्चांवर ncp अध्यकsharad pawar यांनी भाष्य केले आहे.
शरद पवार आज (ता. 23) अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ज्येष्ट नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
या वेळी पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यातले सरकार पाडले, सर्वोच्च न्यायालयाने जर 16 आमदारांना अपात्र ठरवले तर अजित पवार यांना फोडण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पवार म्हणाले, ”उद्या कुणी फोडण्याची भूमिका घेत असले तर ती त्यांची भूमिका असले. मात्र, त्यावर आम्हाला काय भूमिका घ्यायची आहे, ती आम्ही भक्कम पणे घेऊ. मात्र, ती भूमिका काय असेल ते आताच सांगता येणार नाही. कारण या बाबात आम्ही चर्चाच केलेली नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, ती आम्ही मान्य करु, विरोधकांच्या मागणीला मी विरोध करणार नाही. त्यांची जी भूमिका असेल त्या संदर्भात मी त्यांच्या सोबत असणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असे सांगितले.
शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांचे संघटन करण्याची गरज असल्याचेही पवार म्हणाले. एकेकाळी शेतकरी नेते शरद जोशी यांचे काम मोठे होते. मुंबईमध्ये गिरणी कामगारांचेही संघटन होते, त्यांच्यासाठी अनेक नेते लढत होते. पुन्हा त्याच पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.