Jalgaon News : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री व ठाकरे गट प्रमुथ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
1) शिवसेना पक्ष कुणाचा हे जर पाकिस्तानला जरी विचारलं ता ते पण सांगतील शिवसेना कुणाची. मात्र आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे समजत नाही. आयोगाचा धृतराष्ट्र झाला असेल, पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला माहिती आहे.
2) ठराज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील टोला लगावाला. सभेत घुसणार म्हणाले होते? अशा अनेक घुशी आम्ही पाहिल्यात. या घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार”
3) खरंच आज तात्यांची उणीव आहे. कणखर, खंदा, जिद्दी, मेहनती, विश्वासू सहकारी जाणे हे फार मोठ नुकसान असते. असे चाळीस गद्दार गेले तरी फरक नाही. मात्र एक विश्वासू माणूस गेला तरी, फार मोठा खड्डा असतो.
4) यांना ज्याप्रमाणे घोड्यावर बसवलं, तसं पुन्हाच खाली खेचूया, आता हीच ती वेळ आली आहे. निवडून आलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत आहेत. ज्यांनी निष्ठेला डाग, कलंक लावला, हा कलंक तर आपल्याला धुवायचा आहे, पण ते कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाकायचं आहे.
5) आपले सरकारच्या वेळेस कोरोनाचं संकट आलं. हे संकट सरकारनिर्मित नव्हतं. चक्रीवादळांची आपत्ती देखील आली होती.
पण ज्या-ज्या वेळी संकट उभी राहत होती. त्या वेळी आपल्या सरकारची मदत मिळत होती का नव्हती? आता मात्र हे उलट्या पायाच सरकार स्वत:च एका संकट आहे. गारपीट होत आहे, अवकाळी पाऊस पडतोय, यांची मदत तुमच्यापर्यंत तरी पोहचतंय का?
6) सरकारविरोधी बोलेलो, खरं बोललं मागे पोलिस, यंत्रणा पडतात. पोलिसांना देखील सांगणं आहे की, तुम्ही शेतकर्यांची मुलं आहात. शेतकऱ्यांचं त्यांच्या दुखं मांडलं तर तुम्ही त्यांना आत टाकणार का?