आ. अभिमन्यू पवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरव्यास अखेर यश ;जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार शेतक-यांना २९० कोटींची मदत
औसा (प्रतिनिधी) : यंदाच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतक-यांना वेगवेगळया मार्गाने मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करून ती मदत शेतक-यांना मिळवून देण्याची ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली होती.यानुसार शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत मिळवून दिल्यानंतर संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनाही मदत मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली होती.
यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावाही केला होता. या पाठपुरव्यास अखेर यश आले असून या नुकसान भरपाईचा शासकीय आदेश (दि.१३) रोजी निघाला असून लातूर जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार शेतक-यांना २९० कोटींची मदत मिळणार आहे. एकंदरीत ही मदत दिवाळीअगोदरच शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल असे अपेक्षित असून त्यामुळे शेतक-यांची दिवाळी गोड होणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शंखी गोगलगाय, संततधार पाऊस व अतिवृष्टीने लातूर जिल्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून आमदार अभिमन्यू पवार यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना वेगवेगळ्या मार्गाने मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका घेत विधीमंडळात आवाज उठवला होता. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार गोगलगायीने प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या लातूर जिल्यातील शेतक-यांना ९८ कोटींची मदत मिळाली. यामध्ये औसा मतदारसंघातील मदतीचा धनादेश काही दिवसांपूर्वीच आमदार अभिमन्यू पवार यांनी संबंधित बँकांकडे सुपूर्द केले. ही मदत मिळवून देताना आ. अभिमन्यू पवार यांनी संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनाही मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळत सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील मिळून ३ लाख ४२ हजार शेतक-यांना २९० कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत मिळणार आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांनी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही मतदारसंघातील जनतेला दिली होती. शेतक-यांना मदत मिळालीच नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतक-यांना प्रत्यक्षात मदत मिळत असून शेतक-यांना अडचणीच्या काळात सरकारकडून मिळालेल्या या मदतीबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी आभार मानले आहेत.
जिल्ह्यातील शेतक-यांना एकूण ४२० कोटींची मदत
आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे एकंदरीत लातूर जिल्ह्यातील झालेल्या यंदाच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी ४२० कोटींची मदत मिळत असून यामध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी ३७ कोटी ३४ लाख, गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतक-यांना ९३ कोटी तर संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना २९० कोटींची मदत मिळत आहे. एकंदरीत आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामूळे शेतक-यांना ४२० कोटींची म्हणजेच आतापर्यंतची सर्वाधिक मदत मिळत आहे.