• Fri. May 2nd, 2025

30 एप्रिलला होणाऱ्या MPSC परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल, टेलिग्राम लिंकवर 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट

Byjantaadmin

Apr 23, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच् 30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.

MPSC Hall Ticket Hall ticket of MPSC exam to be held on April 30 viral on social media hall ticket of more than 90 thousand students on Telegram link MPSC Hall Ticket : 30 एप्रिलला होणाऱ्या MPSC परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल, टेलिग्राम लिंकवर 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट

हा फक्त नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे.

एमपीएससीच्या परीक्षेचे हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक वायरल होत असल्याची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमपीएससीकडून मिळाली आहे.

उमेदवारांचा अन्य डेटा लीक झालेला नाही, परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच : एमपीएससी

दरम्यान या प्रकरणी एमपीएससीने  स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 2023 रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसंच या चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसंच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही

आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्रे लीक करणाऱ्या चॅनलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचं आयोजन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *