• Sat. May 3rd, 2025

विलासराव- गोपीनाथ मुंडेंच्या मैत्रीची पुन्हा आठवण…

Byjantaadmin

Apr 23, 2023

LATUR अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रेणापूर येथील श्री रेणुकादेवी मातेचे दर्शन घेवून रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील काँग्रेस प्रणित कृषी विकास पॅनेलच्या प्रचाराचा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका आणि एकमेव ध्येय आहे, असे सांगून कृषी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देत विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदारांशी संवाधतांना देशमुख म्हणाले VILASRAO DESHMUKH साहेब आणि GOPINATH MUNDE  साहेब यांनी सामान्य लोकांच्या हिताला केंद्रबिदू मानून आयुष्यभर काम केले. मुंडे साहेबांच्या मतदारसंघाचा काही भाग लातूरला जोडला गेला तेव्हा विलासराव साहेबांनी मुंडे साहेबांना ‘आता ही तुमची माणसं माझी माणसं झाली आहेत. तुम्ही निश्चिंत रहा,’ असा शब्द दिला होता. तो शब्द पाळण्याचे काम विलासराव देशमुख साहेबांनी केले.

यानिमित्ताने एकमेकांशी जोडले गेलेले बंध पुढे माजी दिलीपराव देशमुख, अमित देशमुख यांनी जपले, वृद्धिंगत केले. जे जे नवे लातूरला, ते ते रेणापूरला हवे, यानुसार दिलीपराव देशमुख यांनी साखर कारखाना, बाजार समिती, जिल्हा बँकेच्या माध्यमातून लातूर शहर व तालुक्याच्या विकासाबरोबर रेणापूर तालुक्याला उभे करण्याचे काम केले. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रेणा साखर कारखाना उभारला.

येणाऱ्या काळातही रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक आणखी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या दिशेने एकेक पाऊल टाकत आहोत. रेणापूर बाजार समितीचे विस्तारीकरण, गोडाऊन बांधणी, शेतीमाल तारण योजना आदीच्या माध्यमातून मागील संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. येणाऱ्या काळात आपली बाजारपेठ अधिक मजबूत करण्याबरोबरच नवीन पिकांना बाजार उपलब्ध करणे, रेशीम शेतीला प्रोत्साहन देवून त्यांचे मार्केट उभे करणे.

पानगाव येथे नवीन बाजारपेठ विकसित करणे, रेणापूर शहरात जनावरे व भाजीपाला याकरिता बाजारपेठेचा विस्तार करणे अशी विविध कामे आम्हाला करायची आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होईल, त्यांना आपल्या शेतीमालासाठी सर्व सोयींयुक्त हक्काची बाजारपेठ मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे धिरज देशमुख यांनी सांगितले. कृषी विकास पॅनलमधील हमाल व मापाडी मतदारसंघातील बिनविरोध निवडून आलेले बाळकृष्ण खटाळ यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *