लातूरकरांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन काढावा नागरी कृती व स्मारक संरक्षण समिती
लातूर, वरचेवर वाढत चालेल्या लातूरमधील नागरिकंाच्या जिवीताच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन काढावा,या मागणीसाठी नागरी कृती समिती व स्मारक संरक्षण समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात येत असून,त्यासंदर्भात दि.२४ एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकार्यांना सर्व पक्ष, संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.
लातूरमधून जाणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ चे काम युध्द पातळीवर सुरु आहे. ललातूर शहराच्या जवळ हा महामार्ग आल्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी जमीन संपादित न करता पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या राज्यमार्गानेच (रिंगरोड) चे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होत आहे. शहरातील रहदारी, वाहतूक, गर्दी, वर्दळ या सर्व बाबींचा विचार करता रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया तसेच उड्डाण पूल हे सर्व पर्याय बाजूला ठेवून हेात असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नियमानुसार नसून ते लातूरकरांच्या जिवितासाठी धोकादायक ठरले आहे.छत्रपती चौकापासून ते गरुड चौकापर्यंत असलेल्या या मार्गावर विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा,बाजार समिती,सॉ मील, कडबा व जनावरांचा बाजार तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली वस्ती, वसाहत, शहरीणकरण या सर्व बाबींचा विचार करता, हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहराच्या बाहेरून बाह्यवळण, बायपास रोड राजकीय पक्षाच्या वतीने ाआयोजित करण्यात आलेल्या दि.२० एप्रिल २०२३ रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या एका व्यापक बैठकीत करण्यात आले आहे. लातूरकरांच्या जिवितांच्या संरक्षणासाठी या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवार,दि.२४ एप्रिल २०२३ रोजी सर्व पक्ष ,संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येतणार आहे, सदरील निवेदन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना देण्यात येणार असून,या मार्गावरील असलेल्या महापुरुषांची स्मारके स्थलांतरीत केले जावू नये व राष्ट्रीय महामार्ग शहराच्या बाहेरुन काढावा व विषयांबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
सदर बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे ऍड.उदय गवारे,महाराष्ट्र विकास आघाडीचे ऍड.अण्णाराव पाटील,वीरशैव समाज लातूरचे बसवंतप्पा भरडे, लिंगायत महासंघाचे प्रा.सुदर्शन बिराजदार, लिंगायत एकीकरण समितीचे प्रा.संगमेश्वर पानगावे, बौध्द बसव शाहू ङ्गुले आंबेडकर चळवळीचे बसवंतअप्पा उबाळे, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे ऍड.निरेश करमुडी, जागर समताचे चंद्रशेखर कत्ते, संभाजी ब्रिगेडचे ऍड.गोवविंद सिरसाट,बसव सेनेचे विश्वनाथ खोबरे, राष्ट्रवादीचे ऍड.सुहास व्यंकटराव बेद्रे, अनुभव मंटपचे मनोज राघो, प्रकाश कोरे, रवि बिराजदार, किसान मोर्चाचे लक्ष्मण वंगे, सदाशिव हासनाबादे, जंगम समाज संघटनेचे त्र्यंबक स्वामी, आपचे विक्रांत शंके, आकाश मोटेरावा, शिवलिंग गुजर, शिक्षकमित्र शरद झरे, रयत प्रतिष्ठानचे अजित ङ्गुलारी, आर.डी.काळे, सचिव ङ्गत्तेपूरे, पत्रकार आर.एस.रोडगे, अंतेश्वर कुदरपाके,राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे इंजि. शिवलिंग चौधरी, लिंगायत सेवा संघाचे इंजि. विजयकुमार शेटे, ऍड.अजय कलशेट्ठी, शिवा संघटनेचे दत्ता खंकरे, रामेश्वर कदम, जगन्नाथ कांबळे,लोकप्रहार संघटनेचे अजय सूर्यवंशी, दिपक कांबळे, शिक्षण सम्राट बसवराज धाराशिवे,मुस्लिम क्रांती सेनेचे रङ्गिक तांबोळी, राष्ट्रवादी कांँग्रेसचे बसवेश्वर रेकुळगे, गोरक्षणचे विवेकादंन चामले, लहुजी योध्दा संघटनेेचे दत्ता भूरे, कपिलधारेश्वर प्रतिष्ठानचे राजकुमार बिडवे, लिंगायत संघाचे वैजनाथ जट्टे,युवा गर्जनेचे रवींद्र सावळगी, ऍड.सुरज विभूते, एस.एस.कोरके, बलराज खंडोमलके ,विजयकुमार कुडूंबले, रमेशअप्पा वेरुळे, कावेरी विभुते, संपादक वामन अंकुश, आदर्श उपाध्ये, लिंगायत व्यापारी संघाचे राहूल जवळे, शिवाजी सूर्यवंशी, किशोर राजमाने, लिंगेश्वर बिरादार, विश्वास काळे, अहमद शेख, एम.डी.तिकटे, शिवकुमार तोंडारे, तिलितूत ठाकूर, गणेश मुळे, अशोक नाईकवाडे, सचिन मुळे, व्ही.ए.बिरादार आदि उपस्थित होते
लातूरकरांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन काढावा नागरी कृती व स्मारक संरक्षण समिती
