लातूर शहरातील महालक्ष्मी सिल्क हाऊसचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर प्रतिनिधी-राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील सुभाष चौक परिसरातील क्रॉस कापड लाईन येथील नामदेव जाधव यांच्या नव्यानेच सुरु झालेल्या महालक्ष्मी सिल्क हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जाधव परिवारास यशस्वी व्यावसयिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा विद्याताई पाटील, सौ.स्वातीताई जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, कल्पनाताई मोरे, शितलताई मोरे, गिरीश ब्याळे, माजी नगरसेवक युनूस मोमीन, प्रवीण सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, व्यंकटेश पुरी, सुंदर पाटील कव्हेकर, अभिषेक पतंगे, युनूस शेख, सुलेखा कारेपूरकर, आदीसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, जाधव कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होते.