माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी लातूरच्या इदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा
लातूर (प्रतिनिधी) ईद-उल-फित्र तथा रमजान ईद निमित्ताने लातूर येथील ईदगाह मैदानावर सहकाऱ्यांसह उपस्थित राहून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी मुस्लिम बांधवांची पवित्र नमाज आदा झाल्यानंतर भेट घेतली. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त करून इदगाह मैदानावर उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अडवोकेट किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, विलास को ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, माजी नगरसेवक युनूस मोमीन, गणेश एस.आर.देशमुख, राष्ट्रवादीचे लातूर शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,अजितसिंह पाटील कव्हेकर, प्रदीपसिंह गंगणे, प्रा. प्रवीण कांबळे, सुंदर पाटील कव्हेकर, अहेमदखान पठाण, आसिफ बागवान, नवनाथ आलटे, हनमंत पवार, किरण बनसोडे, आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.