काँंग्रेसचे नगरसेवक सुधीर लखनगावे यांनी जोपासली सर्वधर्मीय माणुसकीची विचारधारा
शिरुर अनंतपाळ:- शहरात रमजानच्या पवित्र महिन्याच्या पार्श्वभुमीवर शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे काँंग्रेसचे नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या वतीने रमजानच्या पवित्र महिन्याचे पावित्र लक्षात घेऊन समता,बंधुत्व,एकता,प्रेम हा मंत्र समाजाला देत मुस्लीम धर्मामध्ये सर्वात पवित्र हा रमजान महिना समजला जातो.या महिन्यात जो काटेकोरपणे पालन करुन अल्लाह ला पावन करुन मौक्ष प्राप्ती करुन घेतो अशा पवित्र महिन्यात ज्या मुस्लीम बांधवांचे रोजे आहेत त्या मुस्लीम बांधवांच्या रोजा ईफ्तार पार्टीसाठी वार्डातील मुस्लीम बांधवांना घरोघरी जाऊन ईफ्तारीचे गरजु समाजउपयोगी घरगुती साहित्य वाटप करुन रमजानच्या शुभकामना देण्यात आल्या.यावेळी नगरसेवक सुधीर लखनगावे, काँंग्रेसचे शहराअध्यक्ष अशोक कोरे,दयानंद वलांडे,ऋत्विक आवाळे,आसिफ ऊजेडे यांच्यासह मित्रमंडळी उपस्थित होते.