मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मराठा आरक्षणाविषयी पुनर्विचार करण्यात यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. आता ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी चेंबर मध्ये चर्चा करून याचिका फेटाळली.रद्द झाल्याच्या विरोधात ११ एप्रिल रोजी या आरक्षणाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चेंबरमध्ये चर्चा करून यावर निर्णय देणार होते. चर्चेनंतर मराठा आरक्षणावर सुनावणी होणार की नाही? हे ठरणार होते. यावर आज न्यायालयाने आपला निकाल दिला आहे
दरम्यान STATE GOVT आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका मांडावी, असे आवाहन याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले होते. महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण लागू केले होते. या आरक्षणाविरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
या निर्णयाविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मराठा आरक्षण याचिकेचे समन्वयक विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. शिवाय, राज्य सरकारनेकडून ही अशाच प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आज निकाल दिला आहे. मराठा आरक्षण याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही- पाटील
दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. पुन्हा जैसे-थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजाने चार मुख्यमंत्री बघितले. मात्र कुठल्याच सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे ही वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली आहे.