निलंगा तालुक्याचे सुपुत्र कृष्णा शिंदे यांची भारतीय अंतराळ संशोधन केंद्र, बंगळूर येथे नियुक्ती
निलंगा तालुक्याचे सुपुत्र गिरकचाळ येथील श्री.हरिपंत शिंदे यांचे चिरंजीव श्री.कृष्णा शिंदे यांची भारतीय अंतराळ संशोधन केंद्र, बंगळूर येथे यांत्रिक कनिष्ठ शास्त्रज्ञ (Mechanical Junior Scientist) पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके यांच्या हस्ते जिजाऊ चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
“आपल्या ग्रामीण भागातील युवक सर्वच क्षेत्रात करत असलेली उल्लेखनीय कामगिरी बघून खरोखरच मनस्वी आनंद वाटतो”,
अश्या शब्दात प्रदेश सचिव अभयदादा यांनी कौतुक करत कृष्णा शिंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जेष्ठ नेते श्री.माधवराव पाटील,श्री.दिलीप पाटील, पानचिंचोलीचे माजी सरपंच श्री.श्रीकांत साळुंके,निलंगा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष,श्री.मदन बिरादार,निलंगा तालुका काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष श्री.अमोल शिंदे,सुनील भोसले,काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख वैभव कुलकर्णी, अल्ताफ शेख,जलील शेख, गिरकचाळचे किसनराव शिंदे, मदान शिंदे, अर्जुन शिंदे हे उपस्थित होते.