लातूर च्या रिंग रोडवरील महात्मा बसवेश्वर , राजीव गांधी यांचा पुतळे हटवू नये……
डॉ. भातांब्रे यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा.
निलंगा:- लातूर शहरातील रिंगरोडवरील माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी व महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवू नये अशी मागणी निलंगा येथील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
लातूर शहरातील कव्हा नाका परिसरात असलेल्या महात्मा बसवेश्वर चौकातील राष्ट्रीय महामार्ग ३६१वरील समतानायक महात्मा बसवेश्वर आणि राजीव गांधी चौकातील माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा पुतळा हटवण्याचा किंवा इतरत्र बसवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटवू नये किंवा इतर ठिकाणी बसवण्यात येऊ नये. आहे त्या ठिकाणीच पुतळा कायम ठेवावा
या मागणीसाठी समाजसेवक डॉ.अरविंद भातांब्रे व लक्ष्मण मुकडे यांनी बुधवार दि.१९एप्रिल पासून लातूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
कव्हा नाका येथील बसवेश्वर चौकातील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा लोकसभागातून बसवण्यात आला आहे. लातूर जिल्हा व परिसरात लिंगायत समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून महात्मा बसवेश्वर लिंगायत धर्माचे संस्थापक असल्याने महात्मा बसवेश्वर हे समाजाचे अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रशासनाने महामार्ग रुंदीकरणाच्या नावावर कोणत्याही परिस्थितीत महात्मा बसवेश्वरांचा व माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे पुतळे हटवू नये. हे दोन्ही पुतळे आहे त्या ठिकाणीच कायम ठेवावेत. अन्यथा लिंगायत समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. लिंगायत समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासनाने सदरील महामार्ग लातूर शहराबाहेर प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोड मार्गे काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा नियोजित जागेवरून हटवू नये यासाठी समाजसेवक डॉ. अरविंद भातांब्रे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला लिंगायत समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. शासनाने त्वरित या आंदोलनाची दखल घ्यावी. उपोषणादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गुरुवार दि.२० एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शिवाजी रेशमे गुरुजी, विनोद आर्य, लिंबण महाराज रेशमे, सोमनाथ आग्रे, नागनाथ सोरडे, राजकुमार चिकराळे, डॉ. साईनाथ कुडूंबले, श्रीशैल बिराजदार, संतोष सोरडे, प्रकाश शेटकार , युवराज बिराजदार, मारुती कस्तुरे, डॉ.मन्मथ गताटे, धनराज निला, नवनाथ कुडूंबले, प्रकाश पटणे, मनोज कोळे, सुरेश सोरडे, विजयकुमार निला, भिमण्णा फुलारी, प्रशांत सोरडे, परमेश्वर धनाश्री, निजगुण सोरडे, बुद्धिवंत मुळे आदीसह अनेकांच्या या स्वाक्षऱ्या आहेत.