पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची (Pune lok sabha by elections) अद्याप घोषणा झालेली नाही, पण पक्षाकडून विविध नावाची चर्चा सुरु आहे. ही पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे
या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली असून पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यांचे भावी खासदार म्हणून दुसऱ्यांदा बॅनर लागले आहेत.जगतापांच्या बॅनरनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेसाठी तयारी करीत कसल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने दावेदारी केल्याने उमेदवारी वरुन महाविकास आघाडीमध्येच संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयाबाहेर प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स लावण्यात आले आहेत. असेच बॅनर वडगाव भागातही लागेल आहेत. याआधीही प्रशांत जगतापांचे भावी खासदाराचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पुणे लोकसभा मतदारसंघात अद्याप पोटनिवडणुक जाहीर झालेली नाही, पण भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेसने बॅनरबाजी करुन आपल्या पक्षातील इच्छुक नेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे PRASHANT JAGTAP वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शहरात अनेक ठिकाणी भावी खासदार म्हणून बॅनर्स लावले आहेत, हे बॅनर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.या जागेसाठी कुणाला उमेदवारी देण्यात येणार याविषयी चर्चा असताना भावी खासदार असा उल्लेख करत भाजपचे नेते जगदीश मुळीक यांच्या नावाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांच्या नावाचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले पोस्टर समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.
या जागेसाठी कुणाला उमेदवारी देण्यात येणार याविषयी चर्चा असताना भावी खासदार असा उल्लेख कर BJP नेते जगदीश मुळीक यांच्या नावाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांच्या नावाचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले पोस्टर समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.बापट यांच्या निधनाच्या तीन-चार दिवसानंतर मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर पुण्यात विविध ठिकाणी झळकले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर मुळीक यांनी ते बॅनर उतरवले होते.